Anil Kapoor confirms Tiger Shroff and Disha Patani are dating | टायगर श्रॉफ आणि दिशा पटनीच्या रिलेशनशिपबाबत अनिल कपूरचा खुलासा....

टायगर श्रॉफ आणि दिशा पटनीच्या रिलेशनशिपबाबत अनिल कपूरचा खुलासा....

गेल्या काही वर्षांपासून ही चर्चा सुरू आहे की टायगर श्रॉफ आणि दिशा पटन दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र, याबाबत दोघांनी कधीच मीडियासमोर हे मान्य केलं नाही की, ते रिलेशनशिपमध्ये आहेत. पण नुकतेच कपिल शर्मा शोमध्ये गेलेले अभिनेते अनिल कपूर यांनी दोघांच्या रिलेशनशिपबाबत जवळपास कन्फर्म केलं आहे की, दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

द कपिल शर्मा शोमध्ये अनिल कपूर यांना विचारण्यात आलं की, ते कोणत्या अभिनेत्याची डाएट चोरी करतील. त्यावर अनिल कपूर यांनी जराही वेळ न घालवता टायगर श्रॉफ हे नाव घेतलं. पण ते लगेच असंही म्हणाले की, पण टायगरने त्याची गर्लफ्रेन्ड दिशा पटनीची डाएट चोरी केली आहे. आतापर्यंत अनिल कपूर आणि टायगरने सोबत काम केलेलं नाही. पण दिशा आणि अनिल कपूरने 'मलंग' मध्ये एकत्र काम केलंय. 

दिशा आणि टायगर अजून ही मान्य केलं नाही की, ते रिलेशनशिपमध्ये आहेत. पण त्यांना नेहमीच सोबत पाहिलं जातं. कधी जिममध्ये तर कधी सुट्टी एन्जॉय करताना पाहिलं जातं. त्यामुळे असं मानलं जातं की, दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी 'बागी २' सिनेमात एकत्र काम केलं होतं. दोघांची जोडी आणि केमिस्ट्री त्यांच्या फॅन्स पसंत देखील आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर दिशा आता सलमान खानच्या आगामी 'राधे - युअर मोस्ट वॉन्टेड भाई' सिनेमात दिसणार आहे. त्यासोबतच दिशा मोहित सुरीच्या 'एक व्हिलन २' मध्ये जॉन अब्राहम आणि तारा सुतारियासोबत दिसणार आहे. टायगर श्रॉफबाबत सांगायचं तर तो 'हिरोपंती २' आणि 'गणपत' सिनेमात दिसणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Anil Kapoor confirms Tiger Shroff and Disha Patani are dating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.