ठळक मुद्देएंड्रीयाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, चित्रपटात बेडरूम सीन देऊन आता मी कंटाळले आहे. मला आता काहीतरी वेगळे करून पाहायचे आहे.

बॉलिवूड, दाक्षिणात्य इंडस्ट्री अथवा हॉलिवूडमध्ये काम करताना अनेकवेळा एखाद्या कलाकाराची एखादी भूमिका प्रसिद्ध झाली म्हणून त्या कलाकाराला त्याच त्याच प्रकारच्या भूमिका ऑफर व्हायला लागतात आणि कलाकारदेखील काम मिळत आहे ना... तर ही भूमिका साकारूया... हा विचार करून त्याच त्याच प्रकारच्या भूमिका साकारताना दिसतात. पण या सगळ्यात आपण एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकलो आहोत हे कलाकाराच्या लक्षात येत नाही. काही काळानंतर याची कलाकाराला जाणीव झाल्यास त्याच्या हातून वेळ निघून गेलेली असते.

एंड्रीया जेरेमिया ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांमधील बोल्ड दृश्यांसाठी ओळखली जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तिला त्याच प्रकारच्या भूमिका ऑफर होतात. ती त्याच प्रकारच्या ऑफर्सना कंटाळली असल्याचे तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. तिने फिल्मीबीट या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, चित्रपटात बेडरूम सीन देऊन आता मी कंटाळले आहे. मला आता काहीतरी वेगळे करून पाहायचे आहे. मला पैसे कमी मिळाले तरी चालतील पण एखादी भूमिका चांगली असेल तर त्या चित्रपटात काम करायचे असे मी ठरवले आहे.

एंड्रीयाने पच्चेकेली मुतुचारम या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. आता तिला चित्रपटसृष्टीत येऊन 15 वर्षांपासून अधिक काळ लोटला आहे. चित्रपटात केवळ बोल्ड सीन देऊन ती आता कंटाळली आहे. ती लवकरच आता मास्टर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला तिने सुरुवात केली आहे. 

एंड्रीयाने चित्रपटात काम करण्यासोबतच काही जाहिरातींमध्ये काम केले आहे. तिने तिच्या करियरची सुरुवात ही रंगमंचावरून केली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Andrea Jeremiah regrets doing intimate scenes PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.