ठळक मुद्देअलाना ही चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेची मुलगी आहे. सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते.

चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आता एक बॉलिवूड स्टार म्हणून ओळखली जाते. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’मधून अनन्याचा डेब्यू झाला आणि अनन्या सर्वांच्या नजरेत भरली. लवकरच ती ‘पती पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. पण तूर्तास आम्ही अनन्या पांडेबद्दल नाही तर तिच्या बहिणीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. होय, अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे हिचे बोल्ड फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.
काही दिवसांपूर्वी अलानाने बिकिनीतील हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले होते. आता तिचे नवे फोटोही असेच व्हायरल होत आहेत.


अलाना ही चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेची मुलगी आहे. सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करणा-या अलानाचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.

अलानाचे हे फोटो बघता, ती सुद्धा बहीण अनन्याच्या पावलावर पाऊल ठेवत लवकरच बॉलिवूडमध्ये येणार असे मानले जात आहे.

विशेष म्हणजे, बॉलिवूडमध्ये येण्याआधीच अलानाने चर्चेत राहायचे कसब शिकून घेतले आहे.

बॉलिवूडमध्ये नसली तरी अलाना ग्लॅमर वर्ल्डचा भाग आहे. शाहरूखची मुलगी सुहाना खान हिच्याशी तिची घट्ट मैत्री आहे. संवेदनशील स्वभावाच्या अलानाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे आणि झोपणे प्रचंड आवडते. अनेकदा ती 14-14 तास झोपते.


सध्या अलाना तिच्या फोटोंमुळेच नाही तर रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहेत. मोनिशा जयसिंगचा मुलगा युदी जयसिंगसोबत अलाना रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ananya Pandey's sister alanna panday flaunts her sexy and bold figure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.