अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच करण जोहरची निर्मिती असलेला 'स्टुडंट ऑफ द इयर २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटात तिच्यासोबत टाइगर श्रॉफ व तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाबाबत अनन्या खूपच उत्सुक आहे.

नुकतेच एका मुलाखतीत अनन्याने सांगितले की, 'बॉलिवूडमध्ये येण्याच्या आधीपासून अभिनेता वरूण धवनसोबत काम करण्याची इच्छा होती. त्याच्यासोबत कोणतीही भूमिका साकारायला मिळाली तरीपणे चालेल. '


वरूण धवनच्या वाढदिवसादिवशी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनन्या गेली होती. तिचा वरूणसोबतचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. अनन्या वरूणसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, 'ज्याच्यावर नेहमीच क्रश आहे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. '


तर दुसरीकडे अनन्या पांडेकार्तिक आर्यन यांचे अफेयर असल्याच्या चर्चादेखील बऱ्याचदा ऐकायला मिळतात. मात्र यावर देखील अनन्याने सांगितले की,' मी सिंगल आहे. कार्तिक खूप क्यूट आहे. त्याच्यासोबत मी 'पति, पत्नी और वो'मध्ये काम करते आहे. त्याच्यासोबत काम करायला खूप मजा येते आहे आणि त्याच्यासोबत काम करणे एन्जॉय करायचे आहे.'


बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिला खूप चांगले फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे.

अनन्या सोशल मीडियावर तर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट केलेल्या एका फोटोशूटने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनन्याचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो का हे पाहावे लागेल.


Web Title: Ananya Pandey wants to do work with Varun Dhawan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.