अरेच्चा,या फोटोमुळे अनन्या पांडेची नेटीझन्स उडवतायेत खिल्ली, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 10:24 AM2019-09-19T10:24:20+5:302019-09-19T10:32:02+5:30

बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री स्टारकिडस अनन्या पांडेचा.

Ananya Pandey Trolls On Social Media For Her Torn Pants People Say Do Not Have Money To Buy Plazo | अरेच्चा,या फोटोमुळे अनन्या पांडेची नेटीझन्स उडवतायेत खिल्ली, एकदा पाहाच

अरेच्चा,या फोटोमुळे अनन्या पांडेची नेटीझन्स उडवतायेत खिल्ली, एकदा पाहाच

googlenewsNext

फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. त्यातच एखादी बड्या व्यक्तीची पार्टी किंवा मोठा इव्हेंट असेल तर सेलिब्रिटी आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री स्टारकिडस अनन्या पांडेचा. कारण नेहमी तिच्या वेगवेगळ्या फॅशन आणि स्टाइलबाबत खूप कौतुक केल्याचे पाहायला मिळते. मात्र आता तिच्या फॅशनेबल कपड्यांमुळेच ती पुन्हा सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी मात्र नेटीझन्स तिचे कौतुक कमी तिची खिल्ली उडवतानाच जास्त पाहायला मिळतात. एका युजर्सने तर तिची पँट बघून म्हटले की, गरीब लोकांसाठी तरी हे कपडे सोड.

 

तिने घातलेल्या पँटही अधिक स्टायलिश वाटावी म्हणून त्या  पँटवर खूप कट्स आहेत. मात्र ती फाटलेली अशीच वाटत असल्यामुळे नेटीझन्स तिची खिल्ली उडवत आहेत. इंडस्ट्रीत प्रत्येक कलाकार हा कोणाचा ना कोणाचा तरी चाहता असतो. अनन्या पांडेला आलिया भट खूप आवडते. अनन्या दिलेल्या मुलाखती सांगितले की, आलियाच्या करिअरग्राफने तिला खूप इंस्पायर केले आहे. सुरुवातीच्या काळात आलियाने कधीच स्वत:ला परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तिची हीच गोष्ट अनन्याला खूप आवडते.  

 

अनन्या पांडे  'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सिनेमा जरी बॉक्स ऑफिसवर हिट झाला नसला तरी या सिनेमातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. 


लवकरच ती ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केले होते. राज चोप्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ७० दशकातील हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. रोमान्स आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचा रिमेक याच नावाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.पती पत्नी और वो' चित्रपटात तो लखनऊच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. 'चिंटू त्यागी' असे त्याचे नाव असणार आहे. कार्तिकचा हा अनोखा अंदाज रुपेरी पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे. आता हा ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Web Title: Ananya Pandey Trolls On Social Media For Her Torn Pants People Say Do Not Have Money To Buy Plazo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.