ठळक मुद्देअनन्याने 'स्टुडंट ऑफ द इयर 2'मध्ये साकारलेल्या भूमिकेचे चांगलंच कौतूक केलंबॉलिवूडमध्ये अनेक लोक तिच्या क्लोज आहेत मात्र शाहरुख खान स्पेशल आहे

बॉलिवूडचा बादशाह म्हणून शाहरुख खानला लोक ओळखतात. कुणीही गॉडफादर नसताना शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये स्वत: दबदबा निर्माण केला. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेलाशाहरुख खान तिच्या वडिलांप्रमाणे वाटतो. 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.

शाहरुख खानची मुलगी सुहाना आणि अनन्या पांडे खूप जवळच्या मैत्रिण आहेत. एका  मुलाखती दरम्यान अनन्या म्हणाली, बॉलिवूडमध्ये अनेक लोक तिच्या क्लोज आहेत मात्र शाहरुख खान स्पेशल आहे. शाहरुख खान तिला वडिलांच्या ठिकाणी आहे. तिचे वडील चंकी पांडे आणि शाहरुखसुद्धा बेस्ट फ्रेंड आहे.  

अनन्याने 'स्टुडंट ऑफ द इयर 2'मध्ये साकारलेल्या भूमिकेचे चांगलंच कौतूक झालं.  यानंतर ती लवकरच कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरसोबत ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. १९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केले होते. राज चोप्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ७० दशकातील हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

रोमान्स आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचा रिमेक याच नावाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. साहजिकच रिमेकमध्ये या कथेला आताच्या ट्रेंड्नुसार नवीन लूक देण्यात येणार आहे. टी-सीरिज आणि बीआर स्टुडिओ अंतर्गत निर्मित हा चित्रपट मुदस्सर अजीज दिग्दर्शित करत आहेत. 
 


Web Title: Ananya pandey says shah rukh khan is like her second father
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.