ठळक मुद्देअनन्याचा लहानपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर केला आहेहा व्हिडीओ कोणत्यातरी फंक्शनमधला आहे

अनन्या पांडे सोशल मीडियावरची स्टार आहे. आज रिलीज झालेल्या 'स्टुडंट ऑफ द ईयर २'मधून अनन्या बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. अनन्याची मामी भावना पांडे यांनी अनन्याचा लहानपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर केला आहे. यात अनन्या पांडे ट्रेडिशनल ड्रेसमध्ये खुप गोड दिसतेय. हा व्हिडीओ कोणत्यातरी फंक्शनमधला आहे. यात तिची मैत्रिण शनाया कपूरसुद्धा दिसतेय. दोघींच्या हातावर महेंदी लावली दिसतेय.यात शनाया कपूर डान्ससुद्धा करताना दिसतेय.  


 
अनन्या पांडे हिला आधीपासून अभिनय क्षेत्राची आवड होती. अनन्या फक्त २० वर्षांची आहे. परंतु फॅशन आणि स्टाइलबाबत असलेली तिची चॉइस अत्यंत क्लासी आहे. सेक्सी आउटफिट्ससोबतच ट्रेडिशनल आउटफिट्स ती एकदम हटके स्टाइलमध्ये कॅरी करते.

तिच्या याच अदांवर तरूणांसोबतच तरूणीही फिदा आहेत. अनन्या आपली स्टाइल आणि फॅशन स्टेटमेंटमार्फत बॉलिवूडमध्ये आधीपासूनच आपली वेगळी जागा तयार करणाऱ्या जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांना टक्कर देत आहे.

 एका कार्यक्रमात अनन्याने केलेल्या अॅक्टमध्ये तिचा अभिनय पाहून तिचे वडील म्हणजेच अभिनेता चंकी पांडेने ती अभिनय क्षेत्रात काम करू शकते असे सांगितले होते, हे अनन्याने एका मुलाखतीत सांगितले. स्टुडंट ऑफ द ईअरनंतर अनन्या  कार्तिक आर्यन सोबत 'पति पत्नी और वो'मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा तिने 'स्टुडंट ऑफ द ईयर २' रिलीज होण्याआधीच साईन केला आहे. 


Web Title: Ananya pandey dancing on mehendi songs video goes viral on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.