'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'खो गए हम कहां'मध्ये दिसणार अनन्या पांडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 04:14 PM2021-09-16T16:14:04+5:302021-09-16T16:14:46+5:30

'खो गए हम कहां' मुंबई शहरातील तीन मित्रांची 'डिजिटल' कहाणी आहे.

Ananya Pandey to appear in 'Kho Gaye Hum Kahan' with 'Gali Boy' fame Siddhant Chaturvedi | 'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'खो गए हम कहां'मध्ये दिसणार अनन्या पांडे

'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'खो गए हम कहां'मध्ये दिसणार अनन्या पांडे

Next

'खो गए हम कहां' मुंबई शहरातील तीन मित्रांची 'डिजिटल' कहाणी आहे. याची पटकथा झोया अख्तर, अर्जुन वरैन सिंह, रीमा कागती यांनी लिहिली असून झोया अख्तर, रीमा कागती, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात तरुण आणि प्रतिभाशाली अभिनेते सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरव यांच्या मुख्य भूमिका असून अर्जुन वरैन सिंह याचा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न असणार आहे.

झोया अख्तरच्या 'गली बॉय'च्या तुफान यशानंतर सिद्धांतचे (एमसी शेर) नाव घराघरात पोहोचले असून त्याला आता अनन्या सोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला चाहते उत्सुक आहेत. आदर्शला देखील यां दोघांसोबत एकत्र पाहणे, आनंददायक असणार आहे, त्याचे 'द व्हाइट टाइगर'मधल्या अभिनयासाठी खूप कौतुक झाले होते.

एक्सेल एंटरटेनमेंट आणि टाइगर बेबी यांनी आज आपला आगामी थिएट्रिकल प्रोजेक्ट, 'खो गए हम कहाँ'ची घोषणा करत पोस्टर आणि व्हिडीओचे अनावरण केले.  चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.


अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास 'स्टूडेंट ऑफ द ईयर-२′ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अनन्या प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटाला 'बेस्ट डेब्यू' फिल्मफेयर अवॉर्डदेखील मिळाला होता. याशिवाय 'पति, पत्नी और वो' आणि 'खाली पीली'मध्येही ती मुख्य भूमिकेत झळकली आहे. दोन्ही सिनेमातील तिच्या भूमिका पसंत केल्या गेल्या.

Web Title: Ananya Pandey to appear in 'Kho Gaye Hum Kahan' with 'Gali Boy' fame Siddhant Chaturvedi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app