ठळक मुद्देअनन्याला कोणत्या अभिनेत्यासोबत प्रणय दृश्य द्यायला आवडेल तर त्यावर तिने वरुण धवनचे नाव घेतले. 

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेने स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर आता ती पती पत्नी और वो या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत.

अनन्याला बॉलिवूडमध्ये कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल याविषयी तिने आजवर अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. आता तर चक्क कोणत्या अभिनेत्यासोबत तिला हॉट सीन द्यायला आवडतील याविषयी तिने खुलासा केला आहे. अनन्या पांडेने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिक आर्यनवर तिचा क्रश असल्याचे सांगितले होते आणि आता एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, तिला कोणत्या अभिनेत्यासोबत प्रणय दृश्य द्यायला आवडेल तर त्यावर तिने वरुण धवनचे नाव घेतले. 

याच मुलाखतीत तिला कोणत्या अभिनेत्यासोबत डेटवर जायला आवडेल असे विचारण्यात आले. तिला कार्तिक आर्यन आणि इशान खट्टर अशा दोन अभिनेत्यांमधून एकाची निवड करायची होती. त्यावर तिने कार्तिक आर्यनसोबत डेटवर जायला आवडेल असे उत्तर दिले. 

अनन्या पांडे ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधीपासूनच चांगलीच चर्चेत होती. ती तिच्या इन्स्टाग्रामला नेहमीच तिच्या स्टायलिश लुकमधील फोटो पोस्ट करायची. त्यामुळे तिच्या इन्स्टाग्रामला तिचे अनेक फॉलोव्हर्स आहेत. अनन्याच्या सौंदर्याची सध्या चांगलीच चर्चा असून तिचे फॅन्स तिच्या दुसऱ्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.  

अनन्या आता पुढील शिक्षण घेणार नसून पूर्ण वेळ अभिनयासाठी देणार आहे. तिचे वडील अभिनेता चंकी पांडेने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. त्याने म्हटले होते की, आता अनन्याने अभिनयावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. तिचे दोन युनिव्हर्सिटीमध्ये अ‍ॅडमिशन झाले होते. पण तिला चित्रपटात काम करायचे असल्याने तिने त्यात प्रवेश घेतला नाही. 

चंकी पांडेने अनन्याच्या अभिनयाविषयी म्हटले होते की, मला तिच्यावर खूप गर्व आहे. तिने खूप छान काम केले. मला भीती होती की ती नीट परफॉर्म करेल की नाही. पण तिने खूप चांगले काम केले. ती खूप हुशार आहे आणि तिला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे.


Web Title: Ananya Panday Was Asked To Pick An Actor For A Steamy Scene: 'I Find Varun Dhawan Very Hot'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.