स्टुंडट ऑफ द इयरच्या सेटवर का रडताना दिसली अनन्या पांडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 09:00 PM2019-04-02T21:00:00+5:302019-04-02T21:00:03+5:30

एका व्हिडिओत अनन्या पांडे रडताना दिसत असून तिला टायगर श्रॉफ शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसेच चित्रपटाच्या टीममधील मंडळी या सेटवर असणाऱ्या लोकांना तुम्ही या गोष्टीकडे लक्ष न देता आपले काम करा असे सांगताना दिसत आहे. 

Ananya Panday tries to prank Tiger Shroff on sets of Student Of The Year 2 | स्टुंडट ऑफ द इयरच्या सेटवर का रडताना दिसली अनन्या पांडे

स्टुंडट ऑफ द इयरच्या सेटवर का रडताना दिसली अनन्या पांडे

googlenewsNext
ठळक मुद्देमी आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक पुनीत यांनी दोघांनी मिळून टायगरला एप्रिल फूल बनवण्याचा प्लान रचला होता. मी त्याच्यासोबत मुद्दामून भांडणं केली आणि त्यानंतर मी रडायला लागली. त्याची यावर प्रतिक्रिया काय असणार हे मला पाहायचे होते.

स्टुंडट ऑफ द इयर हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटाद्वारे करण जोहरने आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांना लाँच केले होते. या पहिल्याच चित्रपटाने या सगळ्यांना स्टार बनवले. आता स्टुडंट ऑफ द इयर २ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाद्वारे करण जोहर काही नवीन चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. या चित्रपटात चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असून तिच्यासोबतच या चित्रपटात तारा सुतारिया, टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

अनन्या पांडे गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिला खूप चांगले फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. अनन्या सोशल मीडियावर तर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण या व्हिडिओत अनन्या पांडे रडताना दिसत असून तिला टायगर श्रॉफ शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसेच चित्रपटाच्या टीममधील मंडळी या सेटवर असणाऱ्या लोकांना तुम्ही या गोष्टीकडे लक्ष न देता आपले काम करा असे सांगताना दिसत आहे. 

अनन्याने पोस्ट केलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर टायगर श्रॉफनेच अनन्याला रडवले असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. पण हा व्हिडिओ संपत असताना अनन्या आपल्या समोर येते आणि सांगते की तिचे रडण्याचे कारण काही वेगळेच आहे. ती सांगते की, हा एक प्रँक असून एक एप्रिलला लोकांना फूल करण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ बनवला होता. 

अनन्या पांडेला टायगर श्रॉफला एप्रिल फूल बनवायचे होते. पण ती टायगरला जास्त सतवू शकली नसल्याने ती त्यात फेल झाली. अनन्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे की, मी आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक पुनीत यांनी दोघांनी मिळून टायगरला एप्रिल फूल बनवण्याचा प्लान रचला होता. मी त्याच्यासोबत मुद्दामून भांडणं केली आणि त्यानंतर मी रडायला लागली. त्याची यावर प्रतिक्रिया काय असणार हे मला पाहायचे होते. पण आमचा हा बेत फ्लॉप झाला. 

Web Title: Ananya Panday tries to prank Tiger Shroff on sets of Student Of The Year 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.