अनन्या पांडे बॉलिवूडमधील 'या' सुंदर अभिनेत्रीला मानते आपलं प्रेरणास्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 11:11 AM2019-07-20T11:11:35+5:302019-07-20T11:11:39+5:30

अनन्या पांडे  'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सिनेमा जरी बॉक्स ऑफिसवर हिट झाला नसला तरी या सिनेमातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. 

Ananya panday consider ali bhatt her inspiration | अनन्या पांडे बॉलिवूडमधील 'या' सुंदर अभिनेत्रीला मानते आपलं प्रेरणास्थान

अनन्या पांडे बॉलिवूडमधील 'या' सुंदर अभिनेत्रीला मानते आपलं प्रेरणास्थान

googlenewsNext

अनन्या पांडे  'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सिनेमा जरी बॉक्स ऑफिसवर हिट झाला नसला तरी या सिनेमातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. 


आजतकच्या रिपोर्टनुसार अनन्या पांडेलाआलिया भट खूप आवडते. अनन्या दिलेल्या मुलाखती सांगितले की, आलियाच्या करिअरग्राफने तिला खूप इंस्पायर केले आहे. सुरुवातीच्या काळात आलियाने कधीच स्वत:ला परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तिची हीच गोष्ट अनन्याला खूप आवडते.   


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, लवकरच ती ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केले होते. राज चोप्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ७० दशकातील हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. रोमान्स आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचा रिमेक याच नावाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.पती पत्नी और वो' चित्रपटात तो लखनऊच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. 'चिंटू त्यागी' असे त्याचे नाव असणार आहे. कार्तिकचा हा अनोखा अंदाज रुपेरी पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे. आता हा ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Ananya panday consider ali bhatt her inspiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.