एका बड्या स्टारने फोन केला अन् अमृता रावच्या हातचा ‘चित्रपट’ गेला...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 06:00 AM2019-01-23T06:00:00+5:302019-01-23T06:00:02+5:30

तूर्तास अमृता आपल्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अमृताने इंडस्ट्रीतील एक अतिशय वाईट अनुभव शेअर केला.

amrita rao shares her experience she replaced by star kid in a film | एका बड्या स्टारने फोन केला अन् अमृता रावच्या हातचा ‘चित्रपट’ गेला...!!

एका बड्या स्टारने फोन केला अन् अमृता रावच्या हातचा ‘चित्रपट’ गेला...!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘पती पत्नी और वो’च्या रिमेकमधून तापसीचीही अशीच अचानक हकालपट्टी करण्यात आली होती. याबद्दलचा संताप तिने बोलून दाखवला होता.

सुमारे सहा वर्षांनंतर अमृता राव मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ‘ठाकरे’ या चित्रपटातून अमृता बॉलिवूडमध्ये वापसी करतेय. तूर्तास अमृता आपल्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अमृताने इंडस्ट्रीतील एक अतिशय वाईट अनुभव शेअर केला.
होय, एका चित्रपटातून तिला एका रात्रीत कसे रिप्लेस केले गेले, हे तिने सांगितले.

ती म्हणाली की, एका मोठ्या मेकर्सने मला आपल्या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटासाठी लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून मला साईनही केले. पण यानंतर एक दिवस अचानक माझ्याजागी एका स्टार किड्ला रिप्लेस केले गेले. माझ्यासाठी हे प्रचंड धक्कादायक होते. काही दिवसानंतर हे सगळे एका मोठ्या स्टारच्या सांगण्यावरून झाल्याचे मला कळते. त्या बड्या स्टारने फोन केला आणि त्याच्या एका फोनवर माझी चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आली. माझ्या जागी एका स्टार किडला संधी दिली गेली. हे ऐकून मला प्रचंड दु:ख झाले. खरे तर इंडस्ट्रीत हे असे होतेच. पण किमान तुला चित्रपटातून काढले, हे मला सन्मानपूर्वक सांगितले जाईल, अशी अपेक्षा होती. पण याऊलट त्या मेकर्सने  मला अतिशय अपमानास्पद वागणूक दिली. या अशा अनुभवानंतर   माझा कुणी गॉडफादर असता तर, असा विचार अनेकदा माझ्या मनात आला. किमान इंडस्ट्रीत काम कसे मिळवायचे, हे तरी मला माझ्या गॉडफादरने शिकवले असते, असे अमृता म्हणाली.


काही दिवसांपूर्वी तापसी पन्नूनेही आपला एक असाच अनुभव शेअर केला होता. ‘पती पत्नी और वो’च्या रिमेकमधून तापसीचीही अशीच अचानक हकालपट्टी करण्यात आली होती. याबद्दलचा संताप तिने बोलून दाखवला होता.

Web Title: amrita rao shares her experience she replaced by star kid in a film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.