अमृता राव साकारणार मीनाताई ठाकरे यांची भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 02:01 PM2018-09-14T14:01:50+5:302018-09-14T14:02:34+5:30

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येतोय आणि यात बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई (पूर्वाश्रमीच्या सरला वैद्य)यांची भूमिका अमृता राव साकारताना दिसणार आहे.

amrita Rao to play Meenatai in Bal Thackeray biopic | अमृता राव साकारणार मीनाताई ठाकरे यांची भूमिका!

अमृता राव साकारणार मीनाताई ठाकरे यांची भूमिका!

googlenewsNext

अभिनेत्री अमृता राव पुनरागमनासाठी तयार आहे. होय, मराठी मनांवर अधिराज्य गाजविणारे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येतोय आणि यात बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई (पूर्वाश्रमीच्या सरला वैद्य)यांची भूमिका अमृता राव साकारताना दिसणार आहे.
‘ठाकरे’ नामक या चरित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटात अमृता राव ही अभिनेत्री मातोश्री मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारणार असल्याची खबर आहे. १३ जून १९४८ रोजी बाळासाहेबांचा मीनातार्इंशी विवाह झाला होता. २० एप्रिल १९९६ रोजी बाळासाहेबांचे थोरले चिरंजीव बिंदूमाधव यांचा अपघाती मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर सहाचं महिन्यांनी मीनातार्इंनीही अखेरचा श्वास घेतला. मीनातार्इंनी यांनी बाळासाहेबांना सतत सोबत केली. अख्ख्या कुटुंबाचा एकत्र बांधून ठेवत, सर्वांचा अतिशय प्रेमाने सांभाळ केला.
मीनातार्इंच्या या भूमिकेसाठी अमृता रावची निवड करण्यात आली आहे. ‘ठाकरे’चे निर्माते संजय राऊत यांच्या मते, या भूमिकेसाठी अमृता राव एकदम योग्य निवड आहे. तिच्या चेहऱ्यावरचा निष्पाप भाव या भूमिकेला साजेसा आहे.
अद्याप अमृताने याबदद्लची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण हा चित्रपट तिने साईन केला तर तिचे पुनरागमन चांगलेच दमदार होणार, हे नक्की.

२०१६ मध्ये अमृता रावने आरजे अनमोल सूदसोबत लग्नगाठ बांधली. त्यापूर्वी सिंग साहब द ग्रेट या चित्रपटात ती अखेरची दिसली. या चित्रपटानंतर ती जणू बॉलिवूडमधून गायबचं झाली. अमृता राव बॉलिवूडमध्ये आली. पण तिची इमेज ‘गर्ल - नेक्स्ट -डोर’ अशीच बनून राहिली.   आपल्या करिअरमध्ये ती कुठल्याही विवादात अडकली नाही. पण अशी एक वेळ आली की, करिना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या ब्रेकअपसाठी अमृता जबाबदार असल्याची चर्चा झाली. अमृताने २००२ मध्ये ‘अब के बरस’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यांनतर ती ‘द लीजेंड आॅफ भगत सिंह’मध्ये दिसली होती. पण अमृताला खरी ओळख शाहिद कपूरसोबतच्या ‘इश्क विश्क’ आणि ‘विवाह’ या चित्रपटाने दिली

Web Title: amrita Rao to play Meenatai in Bal Thackeray biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.