ठळक मुद्देअमिताभ यांची मर्सडीज बेन्ज़ एक एस क्लास ही गाडी विकण्यासाठी ओएलक्सवर जाहिरात करण्यात आली असून या कारची किंमत ९.९९ लाख रुपये आहे. अमिताभ यांची गाडी विकली जात आहे हे कळल्यापासून त्यांच्या फॅन्समध्ये ही कार घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. 

अमिताभ बच्चन यांना सदी का महानायक असे म्हटले जाते. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या आहेत. अमिताभ यांचे फॅन फॉलोव्हिंग प्रचंड असून त्यांच्या फॅनना त्यांच्याविषयी जाणून घ्यायला नेहमीच आवडते. अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमधील त्यांच्या या प्रवासामुळे प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. पण त्याचसोबत त्यांनी मान, सन्मान, पैसा देखील मोठ्या प्रमाणावर कमावला आहे.

अमिताभ बच्चन यांना गाड्यांचे प्रचंड वेड असून त्यांच्याकडे अनेक गाड्या आहेत. त्यांच्या सगळ्याच गाड्या या प्रचंड महागड्या असून त्यांच्या एका कारच्या विक्रीची जाहिरात एका अ‍ॅपवर पाहायला मिळत आहे. या कारचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.  अमिताभ यांची मर्सडीज बेन्ज़ एक एस क्लास ही गाडी विकण्यासाठी ओएलक्सवर जाहिरात करण्यात आली असून या कारची किंमत ९.९९ लाख रुपये आहे. अमिताभ यांची गाडी विकली जात आहे हे कळल्यापासून त्यांच्या फॅन्समध्ये ही कार घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. 

अमिताभ बच्चन यांची ही कार असूनही ती इतकी कमी किमतीत कशी विकली जातेय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण ही कार आता अमिताभ बच्चन यांच्याकडे नाहीये. अमिताभ बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी ही गाडी विकली होती. ही कार एका पारसी व्यक्तीने घेतली होती आणि आता अनेक वर्षांनंतर त्यांनी ही कार विकायचे ठरवले आहे आणि त्याची जाहिरात ओएलक्सवर दिली आहे. या जाहिरातीमध्ये त्या व्यक्तीने या गाडीविषयी माहिती दिली आहे. या गाडीने किती किमीचा प्रवास केला, ही गाडी कोणत्या स्थितीत आहे हे सगळे त्याने या जाहिरातीद्वारे सांगितले आहे. पण त्याचसोबत त्याने एक महत्त्वाची गोष्ट या जाहिरातीत लिहिली आहे. जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे की, ही गाडी पूर्वी अमिताभ बच्चन यांची होती. 

अमिताभ यांचे नाव ऐकताच आता ही गाडी घेण्यासाठी त्यांचे अनेक फॅन्स प्रयत्न करत आहेत. 


Web Title: Amitabh Bachchan’s Old Mercedes-Benz S-Class Put up for Sale at OLX for Rs 9.99 Lakh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.