अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाली खास भेट!  पाहा, ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’चा लूक टीजर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 11:25 AM2018-10-11T11:25:18+5:302018-10-11T11:25:47+5:30

आता अमिताभ ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ या दक्षिणात्य चित्रपटातही दिसणार आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या दाक्षिणात्य चित्रपटाचा लूक मोशन टीजर रिलीज करण्यात आला.

Amitabh Bachchan's look from Chiranjeevi's Sye Raa Narasimha Reddy unveiled on his 76th birthday | अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाली खास भेट!  पाहा, ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’चा लूक टीजर!!

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाली खास भेट!  पाहा, ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’चा लूक टीजर!!

googlenewsNext

 बॉलिवूडमध्ये ‘शहेनशाह’चे पद सांभाळणारे अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. गेली अनेक दशके स्टार ऑफ द मिलेनिअमचे   अनिभिषक्त पद भूषवणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा कसदार अभिनय  अनेक चित्रपटात बघायला मिळतो. आता अमिताभ ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ या दक्षिणात्य चित्रपटातही दिसणार आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या दाक्षिणात्य चित्रपटाचा लूक मोशन टीजर रिलीज करण्यात आला. पांढरी लांब दाढी, कपाळावर लाल टीळा अशा लूकमध्ये अमिताभ यात दिसत आहेत.


 या चित्रटात अमिताभ साऊथ सुपरस्टार चिरंजीवी बरोबर दिसणार आहेत. यात अमिताभ कॅमिओ अर्थात अतिथी भूमिका साकारताना दिसतील. हा चित्रपट स्वातंत्र्य सेनानी यू नरसिम्हा रेड्डी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी बिग बींनी या चित्रपटाबद्दल आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते. मी इतिहासातील सर्वाधिक शूर व्यक्तिरेखा साकारणार आहे, असे त्यांनी लिहिले होते.  ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम अशा चार भाषांत प्रदर्शित होणार आहे.
मध्यंतरी या चित्रपटाचे निर्माते अमिताभ यांच्यावर नाराज असल्याची बातमी आली होती. बिग बींनी परस्पर चित्रपटाचा लूक शेअर केला म्हणून ही नाराजी होती. खरे तर या चित्रपटात त्यांची एक लहानशी भूमिका आहे. पण या तेलगू चित्रपटाबद्दल अमिताभ प्रचंड उत्साहात आहेत. कारण हा त्यांचा पहिला दाक्षिणात्य चित्रपट आहे. याच उत्साहाच्या भरात   निर्मात्यांना न विचारता, अमिताभ यांनी या चित्रपटातील आपल्या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते आणि नेमके हेच निर्मात्यांना खटकले होते.
 अमिताभ सध्या चित्रपटाच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’आणि ‘ब्रह्मास्त्र’ या दोन बॉलिवूडपटांत व्यस्त  आहेत.
 

Web Title: Amitabh Bachchan's look from Chiranjeevi's Sye Raa Narasimha Reddy unveiled on his 76th birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.