मेडिकल कंडिशन...सर्जरी...! अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा खालावली, पोस्टने चाहते चिंतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 10:07 AM2021-02-28T10:07:04+5:302021-02-28T10:28:19+5:30

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांच्यावर  शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

amitabh bachchan to undergo surgery due to medical condition | मेडिकल कंडिशन...सर्जरी...! अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा खालावली, पोस्टने चाहते चिंतीत

मेडिकल कंडिशन...सर्जरी...! अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा खालावली, पोस्टने चाहते चिंतीत

googlenewsNext
ठळक मुद्देअमिताभ यांच्यावर नेमकी कसली सर्जरी आहे. ती कधी आणि कुठे केली जाणार आहे, या गोष्टीची माहिती कोणालाच अजूनही समजली नाही. सर्जरी झाली आहे, की होणार आहे हेदेखील सुद्धा स्पष्ट नाही.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांच्यावर  शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. खुद्द बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमधून ही माहिती दिली आहे.
शनिवारी रात्री लिहिलेल्या ब्लॉगमधून अमिताभ यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. शनिवारी अमिताभ यांनी केवळ एक ओळीचा ब्लॉग लिहिला.  ‘मेडिकल कंडिशन...सर्जरी... आणखी जास्त मी लिहू शकत नाही, एबी...’, असे त्यांनी लिहिले. त्यांचा हा ब्लॉग वाचताच, चाहते चिंतीत झालेत.

त्यांनी केलेल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम पोस्टनेही चाहत्यांच्या चिंतेत भर घातली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी केवळ प्रश्नार्थक चिन्ह तेवढी लिहिलीत. त्यांची अन्य एक ट्विटर पोस्टही गूढ वाढवणारी आहे. ‘कुछ जरूरत से ज्यादा बढ गया है, कुछ काटने पर सुधरने वाला है... जीवन काल का कल है ये, कल ही पता चलेगा कैसे रहे वे...,’ असे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे.

तूर्तास तरी अमिताभ यांच्यावर नेमकी कसली सर्जरी आहे. ती कधी आणि कुठे केली जाणार आहे, या गोष्टीची माहिती कोणालाच अजूनही समजली नाही. सर्जरी झाली आहे, की होणार आहे हेदेखील सुद्धा स्पष्ट नाही. मात्र, आता चाहते त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. लोक सतत कमेंट करुन त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करत आहेत.

Web Title: amitabh bachchan to undergo surgery due to medical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.