ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांचे अकाऊंट रिकव्हर झाले असून अमिताभ यांनी त्यावर पहिले ट्वीट देखील केले आहे.

बॉलिवूडचा शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. हॅकरने अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटवरील प्रोफाईल फोटोही बदलला होता आणि अमिताभ यांच्याऐवजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो दिसत होता.

 

तसेच अकाऊंटवरून पाकिस्तानशी संबंधित मसेजही शेअर करण्यात आला होता. पण आता अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. त्यांचे अकाऊंट रिकव्हर झाले असून अमिताभ यांनी त्यावर पहिले ट्वीट देखील केले आहे.

अमिताभ यांनी काही तासांपूर्वी एक कविता ट्वीट केली असून ही कविता त्यांच्या चाहत्यांना चांगलीच आवडत आहे. त्यांनी लिहिले आहे की, 
सिर्फ शब्दों से न करना,
किसी के वजूद की पहचान

हर कोई , उतना कह नही पाता
जितना समझता और महसूस करता है...

"express not just in words the existence of one ; not everyone has the capability to say what they understand and feel " ~ ab 

अमिताभ यांनी त्यानंतर काही तासांनी आणखी एक कविता ट्वीट केली आहे. त्या कवितेला देखील त्यांच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी लिहिले आहे की,
जी जीवन का यही सत्य है ; स्वीकार करो 
अशुधता से परे उसका बहिष्कार करो


अमिताभ यांचे अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यांच्याकडून ट्विटरवर एक पोस्ट पिन करण्यात आली होती. त्यामध्ये, माझ्या ट्विटर अकाऊंटवर सायबर अटॅक झाल्याचे म्हटले होते. अमिताभ यांच्या अकाऊंटवरून इम्रान खान यांचे फोटो शेअर करण्यात आले होते. तसेच लव्ह पाकिस्तान असे मेसेजही शेअर करण्यात आले होते. टर्कीश सायबर आर्मीकडून हे अकाऊंट हॅक केल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटला 37.4 मिलियन्स म्हणजेच 3 कोटी 70 लाख 40 हजार फॉलोवर्स आहेत. अमिताभ त्यांच्या सोशल मीडियावर चांगलेच अ‍ॅक्टिव्ह असतात. ते नेहमीच या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतात.  


 


Web Title: amitabh bachchan twitter account has recovered
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.