क्रितीच्या बोल्ड फोटोवरची कमेंट बिग बी यांना पडली महाग; युजर्स म्हणाले, दीदी तेरा दादू दीवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 11:49 AM2021-03-28T11:49:56+5:302021-03-28T11:51:05+5:30

'Wow ही Wow बन गया...! अभिनेत्री क्रिती सनॉनने बोल्ड फोटो शेअर केला आणि तिचा हा फोटो पाहून अमिताभ बच्चन यांनाही राहावले नाही.

amitabh bachchan troll for commenting on kriti sanon bold photos netizens says didi tera daddu diwana | क्रितीच्या बोल्ड फोटोवरची कमेंट बिग बी यांना पडली महाग; युजर्स म्हणाले, दीदी तेरा दादू दीवाना

क्रितीच्या बोल्ड फोटोवरची कमेंट बिग बी यांना पडली महाग; युजर्स म्हणाले, दीदी तेरा दादू दीवाना

googlenewsNext
ठळक मुद्देक्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, लवकरच ती ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे.

अभिनेत्री क्रिती सनॉनने बोल्ड फोटो शेअर केला आणि तिचा हा फोटो पाहून अमिताभ बच्चन यांनाही राहावले नाही. अमिताभ यांनीही क्रितीच्या या फोटोंवर कमेंट केली. मग काय? अमिताभ जबरदस्त ट्रोल झालेत. होय, सोशल मीडिया युजर्सनी यावरून अमिताभ यांची चांगलीच मजा घेतली.  

क्रितीने बोल्ड व ग्लॅमरस फोटो शेअर केल्यानंतर तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक व कमेंट्सचा वर्षाव केला. एका कमेंटने मात्र सर्वांचे लक्ष वेधले. ही कमेंट होती, अमिताभ बच्चन यांची. त्यांनी या फोटोवर ‘WOW’ अशी कमेंट केली. त्यांची ही कमेंट पाहून सोशल मीडिया युजर्स असे काही सैराट झालेत की, क्षणभर बिग बींनाही कमेंट केल्याचा पश्चाताप व्हावा.

‘दीदी तेरा दादू दीवाना,’ अशा शब्दांत एका युजरने अमिताभ यांना ट्रोल केले. अन्य एका युजरने ‘बच्चन साहब मौज में... जया और रेखा क्रिती सनॉन के खोज में,’ असे लिहून अमिताभ यांची मजा घेतली. ‘दीदी दादू की भावनाओं मे सम्मान है आपके लिए,Wow,’ अशी मजेदार कमेंट केली. काही युजर्स मात्र अमिताभ यांचा बचाव करताना दिसले. अमिताभ यांच्या कमेंटमध्ये चुकीचे काय, हेच मला कळत नाहीये, असे लिहित अनेकांनी ट्रोलर्सला सुनावण्याचा प्रयत्न केला.
 एकंदर काय तर क्रितीच्या बोल्ड फोटोंवर कमेंट करणे अमिताभ यांना चांगलेच महागात पडले.

क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, लवकरच ती ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती साऊथ सुपस्टार प्रभास आणि सैफ अली खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.  हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: amitabh bachchan troll for commenting on kriti sanon bold photos netizens says didi tera daddu diwana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.