ठळक मुद्देनव्याच्या एका चाहत्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आत्तापर्यंत चार लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा कुण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. नव्याचे फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नव्या ही अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची मुलगी आहे. नव्या अतिशय स्टाईलिश आहे. त्यामुळेच येत्या काळात ती बॉलिवूडमध्ये दिसली तर नवल वाटायला नको. सोशल मीडियावर नव्या बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. आपल्या मित्रांसोबत अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

नव्याने अलीकडे आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. फनलव्हिंग नव्याला पार्टी करणे अतिशय आवडते. आता अशा फनलव्हिंग अभिनेत्रीला मोठ्या पडद्यावर पाहणे कुणाला बरे आवडणार नाही? अन्य स्टार डॉटर्सप्रमाणे नव्यानेच्याही बॉलिवूड डेब्यूची प्रतीक्षा सिनेप्रेमींना आहे, ती त्यामुळेच.

मध्यंतरी नव्या बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी चर्चा रंगली होती. आता या चर्चेत किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण एक मात्र खरे की, नव्या फिटनेसच्या बाबतीत अतिशय सजग आहे. तूर्तास नव्याचा एक वर्कआऊट व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत नव्या न्यूयॉर्कच्या एका रस्त्यावर वर्कआऊट करताना दिसतेय.


नव्याच्या एका चाहत्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आत्तापर्यंत चार लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. साहजिकच अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्यात. काहींना नव्याचा व्हिडीओतील अंदाज आवडला आणि नेहमीप्रमाणे काहींनी यावरून नव्याला ट्रोल केले. ‘जिमचे पैसै नाहीत की, लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा खटाटोप आहे,’ असा सवाल एका युजरने नव्याला केला.
  तुम्हीही नव्याचा हा व्हिडीओ बघा आणि तो कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.


Web Title: amitabh bachchan granddaughter navya naveli nanda doing working out in new york video viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.