78 वर्षांचे अमिताभ बच्चन दीपिकापेक्षा ‘महाग’, प्रभासच्या सिनेमासाठी घेणार इतके कोटी

By रूपाली मुधोळकर | Published: October 11, 2020 05:30 PM2020-10-11T17:30:00+5:302020-10-11T17:30:02+5:30

चर्चा खरी मानाल तर या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांना दीपिकापेक्षाही अधिक फी मिळाली आहे.

amitabh bachchan gets highest fees to deepika padukone for prabas and nag ashwin film | 78 वर्षांचे अमिताभ बच्चन दीपिकापेक्षा ‘महाग’, प्रभासच्या सिनेमासाठी घेणार इतके कोटी

78 वर्षांचे अमिताभ बच्चन दीपिकापेक्षा ‘महाग’, प्रभासच्या सिनेमासाठी घेणार इतके कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत.  

प्रभाससोबतच्या सिनेमासाठी दीपिका पादुकोणने 20 कोटी रूपये मानधन घेतल्याचे ऐकून सगळ्यांचे डोळे पांढरे झाले होते. पण थांबा, चर्चा खरी मानाल तर या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांना दीपिकापेक्षाही अधिक फी मिळाली आहे.
होय, दिग्दर्शक नाग अश्विनच्या प्रभास आणि दीपिका पादुकोणच्या आगामी सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. दीपिका आणि प्रभासला एकत्र बघण्यासाठी फॅन्स आतुर झाले आहेत. अशात आता या सिनेमात बिग बींची एन्ट्री झाली आहे. अजून चित्रपटाचे टायटल ठरलेले नसले तरी या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमासाठी स्टार्सनी घेतलेल्या मानधनाच्या आकड्यांवरूनही  हा आगामी सिनेमा चर्चेत आहेत.

दीपिकाने या सिनेमासाठी 20 कोटी रूपये इतके मानधन घेतले आहे. तर प्रभासने तब्बल 100 कोटी. रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी साउथचा सुपरस्टार प्रभास पूर्ण ७० कोटी रूपये चेकने घेणार आहे. तर ३० कोटी रूपये तो डबिंग राइट्सचे घेणार आहे. इतकेच नाही तर यासोबतच प्रभास भारतातील हायएस्ट पेड अभिनेता बनला आहे. प्रभासच्या पाठोपाठ अमिताभ बच्चन या सिनेमातील दुसरे हायएस्ट पेड स्टार बनले आहेत. प्रभासनंतर सर्वाधिक मानधन अमिताभ यांना दिले गेले आहे आणि ही रक्कम दीपिकापेक्षा अधिक आहे.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभास इतकी नाही पण त्याच्या तोडीस तोड रक्कम अमिताभ यांना मानधनापोटी मिळणार आहे. अमिताभ हे देशाचे सर्वाधिक प्रतिष्ठित सुपरस्टार आहेत आणि सिनेमात प्रभाससोबत ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिसणार आहेत.
हा सिनेमा प्रभासचा 21 वा सिनेमा आहे. त्यामुळे ‘प्रभास 21’ असे या सिनेमाचे अस्थायी नामकरण करण्यात आले आहे. दिग्दर्शक नाग अश्विन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. या सिनेमाद्वारे तेलुगू सिनेसृष्टीत दीपिकाचा हा डेब्यू चित्रपट असणार आहे.
 अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत.  अयान मुखर्जीच्या सुपरनॅच्युरल थ्रीलर ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये ते दिसणार आहेत. यात त्यांच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय आहे. तसेच नागराज मंजुळेसोबतचा त्यांचा ‘झुंड’ हा सिनेमाही तयार आहे.  

दीपिका पादुकोण बनली सर्वात महागडी अभिनेत्री, प्रभाससोबतच्या सिनेमासाठी घेतले इतके कोटी  

धमाका! प्रभासच्या सिनेमात दिसणार महानायक अमिताभ बच्चन, म्हणाला - स्वप्न सत्यात उतरतंय....

दीपिका पादुकोनसोबतच्या सिनेमासाठी प्रभास घेणार रेकॉर्ड ब्रेक मानधन, किती ते वाचून चक्रावून जाल...

Web Title: amitabh bachchan gets highest fees to deepika padukone for prabas and nag ashwin film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.