ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी अमिताभ यांना कोरोनाने ग्रासले होते. त्याकाळात एका हेटरने त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या केबीसी12 मुळे चर्चेत आहेत. पण सध्या एका वेगळ्या कारणाने बिग बी सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. कारण काय तर अवयवदान. होय, अमिताभ यांनी अवयवदानाचा संकल्प सोडला आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली. मात्र त्यांच्या या ट्विटवर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. मग काय, चाहत्यांमध्येच एक वेगळे ट्विटर वॉर रंगले.

मैं शपथ ले चुका...

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत अवयवदानाची माहिती दिली. मी अवयवदानाची शपथ घेतलीय. मी या पवित्र कार्याची प्रतिक असलेली हिरवी रिबीन लावलीय, असे ट्विट अमिताभ यांनी केले. सोबत एक फोटोही पोस्ट केला. यात त्यांनी त्यांच्या सूटवर ग्रीन रिबीन लावलेली दिसतेय.

फॅन्स म्हणाले, तुम्ही डोनर बनू शकत नाही़..


अमिताभ यांच्या या ट्विटवर त्यांच्या फॉलोअर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. एकाने तर चक्क ‘तुम्ही डोनर बनू शकत नाही,’ असे लिहिले. सर, हिपेटाइटिस-बी होता. त्यामुळे तुमचे अवयव अन्य कोणत्याही व्यक्तीला दान करता येणार नाही. सोबत तुमचे लिव्हर ट्रान्सप्लांटही झाले आहे, तुम्ही औषधांवर आहात. तुम्ही अवयव दान करून इतरांना जीवनदान देऊ इच्छिता, या भावनेचा मी आदर करतो. मात्र माफ करा, शास्त्रीयदृष्ट्या तुम्ही एक डोनर बनू शकत नाही, असे एका युजरने यावर लिहिले.  

दुस-या एका चाहत्याने दिले उत्तर


तुम्ही डोनर बनू शकत नाही, या युजरच्या ट्विटला खुद्द अमिताभ यांनी उत्तर दिले नाही. पण एका चाहत्याने मात्र यावर उत्तर दिले. ‘ते डोळे, किडनी, हृदय डोनेट करू शकतात. या बकवास गोष्टी बंद कर. त्यांनी एक चांगला संदेश दिला आहे,’ असे या चाहत्याने लिहिले.

अन् भडकले होते बिग बी
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांना कोरोनाने ग्रासले होते. त्याकाळात एका हेटरने त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता.
‘तू कोरोनाने मेलास तर बरा’, असे या हेटरने लिहिले होते. हे पाहून अमिताभ प्रचंड संतापले होते.
‘मिस्टर अज्ञात, तू तर तुझ्या वडिलांचे नावही लिहिलेले नाहीस. कदाचित तुझे वडिल कोण हे तुला ठाऊक नसावे. दोन गोष्टी घडू शकतात. एक मी जिवंत राहील किंवा मरेन. पण मी मेलोच तर तू एका सेलिब्रिटीवर भडास काढण्याची, त्याची निंदा करू शकणार नाहीस. तू लिहिलेले लोकांच्या लक्षात आणू देणारा अमिताभ त्यावेळी जिवंत नसेल. मात्र हो, परमेश्वराच्या कृपेने मी जगलोच तर तुला लोकांचा प्रचंड राग सहन करावा लागेल. केवळ माझाच नाही माझे 9 कोटी फॉलोअर्स तुज्यावर तुटून पडतील. तुला माहित असेलच की, माझे चाहते जगभरात आहेत. प्रत्येक कोप-यात. पूवेर्पासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि ही केवळ पेजची ईएफ नाही अर्थात एक्सटेंडेड फॅमिली नाही तर एक्सटर्मिनेशन फॅमिली आहे. ठोक दो साले को, मला फक्त त्यांना एवढे सांगायची देर आहे...’, अशा शब्दांत अमिताभ यांनी या हेटरला सुनावले होते.

कोरोनाने मेलास तर बरा...! हेटर्सच्या या वाक्याने कधी नव्हे इतके भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले ठोक दो...

Kaun Banega Crorepati 12: ‘केबीसी’साठी अमिताभ बच्चन यांनी वाढवली फी, घेणार इतके कोटी?

कोरोनामुळे अनेकांच्या 'अंतिम' इच्छेला मूठमाती; अवयवदानाचा/देहदानाचा टक्का घसरला

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: amitabh bachchan became organ donor look how his fans react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.