Amitabh bachchan ayushmann khurana to team up for sujit sarkar film gulabo sitabo | अमिताभ बच्चन आणि आयुषमानच्या फॅन्ससाठी खूशखबर, पहिल्यांदा शेअर करणार स्क्रिन
अमिताभ बच्चन आणि आयुषमानच्या फॅन्ससाठी खूशखबर, पहिल्यांदा शेअर करणार स्क्रिन

ठळक मुद्देगुलाबो सिताबो'मध्ये आमिताभ-आयुषमान एकत्र दिसणार आहेत शुजीत सरकारने यांनी फोटो शेअर करुन ही माहिती दिली

अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणा यांच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. बिग बी आणि आयुषमान लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. निर्माता शुजीत सरकार यांच्या 'गुलाबो सिताबो'मध्ये दोघे एकत्र असणार आहेत. हा एक कॉमेडी सिनेमा आहे. सोशल मीडियावर शुजीत सरकारने यांनी फोटो शेअर करुन ही माहिती दिली. आयुषमान खुराणाने शुजीत सरकार यांच्यासोबत याआधी ही विक्की डोनर सिनेमाता काम केले आहे. तर अमिताभ बच्चन हे त्यांच्या पीकू सिनेमात दिसले होते.एक मुलाखती दरम्यान बोलताना शुजीत सरकार म्हणाले होते, आयुषमान खुराणा आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमाची कथा जुही चतुर्वेदीने लिहिली आहे. पुढच्या महिन्यांपासून या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार आहे. 'गुलाबो सिताबो' सिनेमाला याच वर्षी रिलीज करण्याचा विचार सुरु आहे. सिनेमात उत्तर प्रदेशाच्या राजधानीमध्ये बोलली जाणाऱ्या भाषेचा वापर करण्यात येणार आहे.    अमिताभ आयुषमान शिवाय इम्रान हाश्मीसोबत 'चेहरे' सिनेमात दिसणार आहे. 'चेहरे' हा सिनेमा २१ फेब्रुवारी, २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात क्रिती खरबंदा, रिया चक्रवर्ती, सिद्धांत कपूर, अन्नू कपूर व रघुवीर यादव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर आयुषमान खुराणा 'शुभ मंगल सावधान'च्या सीक्वलमध्ये झळकणार आहे. या सिनेमाचे नाव 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असे आहे.
 

English summary :
Good news for the fans of Amitabh Bachchan and Ayushmann Khurana. Big B and Ayushman will soon share a screen together in Producer Shukit Sarkar's 'Gulabo Sitabo'.


Web Title: Amitabh bachchan ayushmann khurana to team up for sujit sarkar film gulabo sitabo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.