बिग बी अमिताभ बच्चन सध्या मुंबईतल्या नानावटी हॉस्पिटल दाखल आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून अमिताभ बच्चन हे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार यकृताच्या आजारामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  डॉ. बर्वे त्यांच्यावर उपचार करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, त्यांचे फक्त 25 टक्के यकृत काम करते आहे 75 टक्के खराब झाले आहे.


१९८२ मध्ये कुलीच्या शूटिंग दरम्यान त्यांना दुखापत झाली होती.  वेल्लोरच्या प्रसिद्ध सर्जन एच.एस. भट्ट यांनी अमिताभ यांचे सगळे रिपोर्ट पाहिले आणि त्यांच्या शरीरात इन्फेक्शन पूर्णपणे पसरले असून त्यांच्यावर तात्काळ ऑपरेशन करण्याची गरज असल्याचे सांगितले.

ऑपरेशन करताना डॉक्टरांच्या लक्षात आले की, त्यांच्या पोटातील महत्त्वाच्या आतडीला प्रचंड दुखापत झाली होती. त्यांचे ऑपरेशन यशस्वी झाले. पण त्यानंतर त्यांना लगेचच निमोनिया झाला. त्यामुळे त्यांचे रक्त पातळ होत होते.


ब्लड डेंसिटी अतिशय कमी झाली होती. त्यामुळे मुंबईतून ब्लड डेंसिटी सुधारण्यासाठी ब्लड सेल्स मागवण्यात आल्या. त्यानंतर एक-दोन दिवसांनी त्यांची तब्येत सुधारली. पण पुन्हा त्यांना प्रचंड त्रास व्हायला लागला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णायलात दाखल करण्याचे डॉक्टरांनी ठरवले.

मुंबईला आणल्यावर त्यांच्यावर पुन्हा ऑपरेशन करण्यात आले. हे ऑपरेशन जवळजवळ आठ तास सुरू होते. हे ऑपरेशन यशस्वी झाले आणि त्यानंतर महिनाभराने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  अशा रितीने अमिताभ यांनी मृत्यूशी संघर्ष केला म्हणून त्यांचा हा दुसरा जन्म मानला जातो.
 


Web Title: Amitabh bachchan admitted in hospital due to liver problem
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.