ठळक मुद्देअमितने मुलाखतीत सांगितले की, मी सिंगल असल्याच्या बातम्या खऱ्या असून माझ्या नव्या आयुष्याला मी सुरुवात केली आहे. 

सुलतान फेम अमित संध सध्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ऐनाबेल दासिल्वा या मॉडेलला तो गेल्या वर्षभरापासून डेट करत होता. त्या दोघांच्या नात्याची चांगलीच चर्चा सध्या रंगली होती. हे दोघे नेहमीच त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असत. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी त्या दोघांचे ब्रेकअप झाले असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. त्या दोघांनी या बातम्यांवर मौन राखणेच पसंत केले होते. पण आता यावर अमितने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

अमितने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी सिंगल असल्याच्या बातम्या खऱ्या असून माझ्या नव्या आयुष्याला मी सुरुवात केली आहे. 

अमित आणि ऐनाबेल दोघेही त्यांच्या नात्याबाबत सिरियस होते. पण तरीही आपण एकमेकांसाठी परफेक्ट नाही आहोत असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी वेगळे व्हायचे ठरवले असे म्हटले जाते. त्यांनी २०१८ मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर ते दोघे नैंनिताल, मनाली, लंडन अशा विविध ठिकाणी फिरायला गेले होते. या ट्रीपचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. पण आता अमितने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून हे सगळे फोटो डीलिट केले आहेत. 

अमित ऐनाबेलच्या प्रेमात पडण्याआधी अनेक वर्षं अभिनेत्री नीरू बाजवासोबत नात्यात होता. ते दोघे लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील राहात होते. अमित बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्ये होता. त्यावेळी त्याने घरात नीरू आणि त्याच्या प्रेमप्रकरणाविषयी अनेकवेळा सांगितले होते. तसेच ते दोघे नच बलिये या कार्यक्रमात देखील एकत्र झळकले होते. नीरूसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अमितला चांगलाच धक्का बसला होता. अमितने ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये देखील सांगितली होती. नीरूने अस्तित्व एक प्रेम कहानी या मालिकेत काम केले होते. काही मालिकांमध्ये काम केल्यानंतर तिने पंजाबी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. तिने फूंक २, मिले ना मिले हम यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

अमिताने क्यों होता है प्यार या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याची पहिलीच मालिका चांगलीच गाजली होती. त्याने काय पो छे या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटानंतर त्याने गोल्ड, सुलतान यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

Web Title: Amit Sadh Confirms Breakup with Model Annabel DaSilva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.