केवळ जाहिरातींसाठी घेतो 11 कोटी, जगतो असे जीवन वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य ! कोण आहे 'हा' अभिनेता ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 03:44 PM2019-12-06T15:44:17+5:302019-12-06T15:45:37+5:30

कोणतंही काम उत्साह, जिद्द आणि मेहनतीने केल्यास जीवनात अशक्य असं काही राहणार नाही आणि प्रत्येकजण बनेल मिस्टर परफेक्शनिस्ट असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Amir Khan Charges INR 11 Crore for An Advertisement | केवळ जाहिरातींसाठी घेतो 11 कोटी, जगतो असे जीवन वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य ! कोण आहे 'हा' अभिनेता ?

केवळ जाहिरातींसाठी घेतो 11 कोटी, जगतो असे जीवन वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य ! कोण आहे 'हा' अभिनेता ?

googlenewsNext

तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हे सिद्ध करून दाखवलंय मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने. काम कोणतंही असो मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात आमिर खान कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच आमिरच्या यशाचे खरं कारण आहे. त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत आमिर खानचेही नाव सामील झाले आहे.   


आमिर खान आज बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अॅक्टर्स पैकी एक आहे. कारण फक्त उत्पादनांच्या जाहिरातींसाठी आमिर खान 11 कोटी रू. इतके मानधन घेतो. तर आमिर खान एखादी फिल्म साईन करताना मानधनापेक्षा प्रॉफिट शेअरिंगला प्राधान्य देतो. आमिर खानचा एखाद्या फिल्मच्या प्रॉफिटमध्ये 70 टक्के हिस्सा घेतो. त्यामुळेच तर आमिर आज बॉलिवूडमधील सर्वात महागड्या स्टार्सच्या पंक्तित बसला आहे. 

आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे आमिरने नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कोणतंही काम करताना तो त्याच उत्साहाने काम करतो. त्यामुळं आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही. कोणतंही काम उत्साह, जिद्द आणि मेहनतीने केल्यास जीवनात अशक्य असं काही राहणार नाही आणि प्रत्येकजण बनेल मिस्टर परफेक्शनिस्ट असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.


 

Web Title: Amir Khan Charges INR 11 Crore for An Advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.