फ्लाइटमध्ये स्टाफ मेंबर्सने केलं असं काही, जे पाहून अमीषा पटेलला रडूच कोसळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 07:30 PM2020-12-25T19:30:00+5:302020-12-25T19:30:02+5:30

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली.

Ameesha patel gets teary eyed watching airline staff dance on kaho naa pyaar hai title track watch video | फ्लाइटमध्ये स्टाफ मेंबर्सने केलं असं काही, जे पाहून अमीषा पटेलला रडूच कोसळलं

फ्लाइटमध्ये स्टाफ मेंबर्सने केलं असं काही, जे पाहून अमीषा पटेलला रडूच कोसळलं

googlenewsNext

अभिनेत्री अमिषा पटेलने 20 वर्षांपूर्वी 'कहो ना प्यार है' या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. हृतिक रोशननेही या सिनेमाव्दारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर अमेषा आणि हृतिक रातोरात स्टार झाले होते. अलीकडेच अमिषा पाटलेचा  एअरपोर्टवरचा एका व्हिडीओ व्हायरल होतो आहे. अमिषा फ्लाइटने जाण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचली, त्यावेळी एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांनी 'कहो ना प्यार है' या गाण्यावर डान्स केला, जे बघून अमिषा खूप भावूक झाली. 


सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टाफचे सदस्य ‘कहो ना प्यार है’ या गाण्यावर ताल धरताना दिसतायेत.  तर अमिषा त्यांचा डान्स बघून भावूक झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. त्यानंतर तिनेसुद्धा जाऊन स्टाफ मेबर्ससोबत डान्स केला. 

अमीषाचा आगामी सिनेमा ‘देसी मॅजिक’ आहे. यात ती डबल रोलमध्ये दिसणार आहे. याशिवाय द ग्रेट इंडियन कसीनो आणि तोबा तेरा जलवा हे दोन सिनेमेही तिच्याजवळ आहेत. खरे तर अमिषाला कहो ना प्यार है आणि गदर एक प्रेमकथा या चित्रपटांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. पण या चित्रपटांमुळे मिळालेले स्टारडम तिला सांभाळता आले नाही.

त्याकाळात अमिषाने ‘सिलेक्टीव्ह’ होण्याऐवजी एकापाठोपाठ एक डझनभर सिनेमे साईन केलेत. यातले बहुतेक सिनेमे आपटले आणि अमिषाच्या करिअरची नौका डळमळू लागली. या झटक्यातून सावरायला तिला तीन वर्षं लागली. 2006 मध्ये अब्बास मस्तानच्या ‘हमराज’ने तिच्या करिअरला काहीसा आधार दिला. पण तोपर्यंत अमिषाचे स्टारडम संपले होते. 2018 साली ‘भैयाजी सुपरहिट’ हा तिचा सिनेमा रिलीज झाला. पण हा सिनेमाही दणकून आपटला.

Web Title: Ameesha patel gets teary eyed watching airline staff dance on kaho naa pyaar hai title track watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.