ameesha patel car accident fake news viral on social media | काय खरंच अमिषा पटेलच्या कारला झाला अपघात? जाणून घ्या  सत्य
काय खरंच अमिषा पटेलच्या कारला झाला अपघात? जाणून घ्या  सत्य

ठळक मुद्देतूर्तास सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड फोटो शेअर केल्यामुळेच ती अधिक चर्चेत असते. यावरून अनेकदा ती ट्रोलही झालीय.

अमिषा पटेल सध्या बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती बरीच अ‍ॅक्टिव असते. काल तिच्याबद्दल अशी काही अफवा पसरली की, तिचे चाहते प्रचंड घाबरले. होय, अमिषाच्या गाडीला गंभीर अपघात झाल्याची पोस्ट काल व्हायरल झाली. मुंबई-पुणे मार्गावर अमिषाच्या कारला अपघात झाल्याचे या  सांगितले गेले. शिवाय या पोस्टसोबत अपघातात अक्षरश: चेंदामेंदा झालेल्या गाडीचा फोटोही शेअर केला गेला. अखेर अमिषाला समोर येत खुलासा करावा लागला. ‘मी अगदी सुखरूप आहे. माझ्या कारला अपघात झाल्याची बातमी पूर्णत: निराधार व खोटी आहे. तुम्ही दाखवलेले प्रेम आणि चिंता यासाठी आभार,’ असे ट्वीट करत तिने अपघाताची बातमी निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. 
अमिषाने ‘कहो ना प्यार है’ या सुपरहिट सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाल्याने अमिषा नावारूपास आली. पण लीड अभिनेत्री म्हणून तिच्या पदरी केवळ तीन ते चार हिट सिनेमे जमा आहेत.  यामध्ये ‘गदर: एक प्रेम कथा, हमराज  आणि  पुडिया गीथे  या तामिळ सिनेमाचा समावेश आहे.
 अमिषाने 30हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. हृतिक रोशन, सनी देओल, आमिर खान, सैफ अली खान, अनिल कपूर, संजय दत्त आणि अक्षय कुमार या स्टार्ससह काम केले. पण याचाही फायदा अमिषाला झाला नाही. तिच्या करिअरचा ग्राफ उंचावण्याऐवजी खाली आला. गेल्या कित्येक वर्षात ती एकाही सिनेमात झळकलेली नाही. तूर्तास सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड फोटो शेअर केल्यामुळेच ती अधिक चर्चेत असते. यावरून अनेकदा ती ट्रोलही झालीय.


Web Title: ameesha patel car accident fake news viral on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.