कधी काळी एलआयसी एजंट असलेल्या अमरिश पुरींनी मराठी चित्रपटातून केली होती अभिनयाला सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2017 12:18 PM2017-06-22T12:18:13+5:302017-06-22T17:48:13+5:30

‘मोगॅँबो खूश हुआ’ असे म्हणत भल्याभल्यांच्या मनात धडकी भरविणाºया दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांचा बॉलिवूड प्रवास सध्याच्या स्ट्रगल अ‍ॅक्टर्ससाठी ...

Amarish Puri, who is a LIC agent, has started acting from Marathi film. | कधी काळी एलआयसी एजंट असलेल्या अमरिश पुरींनी मराठी चित्रपटातून केली होती अभिनयाला सुरुवात!

कधी काळी एलआयसी एजंट असलेल्या अमरिश पुरींनी मराठी चित्रपटातून केली होती अभिनयाला सुरुवात!

googlenewsNext
ोगॅँबो खूश हुआ’ असे म्हणत भल्याभल्यांच्या मनात धडकी भरविणाºया दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांचा बॉलिवूड प्रवास सध्याच्या स्ट्रगल अ‍ॅक्टर्ससाठी खºया अर्थाने प्रेरणादायी आहे. कारण अतिशय कठोर परिश्रम करून त्यांनी इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केले होते. नायक बनण्यासाठी मुंबईत आलेल्या अमरीश यांना नशिबाने खलनायक केले. परंतु तिथेही त्यांनी कठोर परिश्रम करून आपल्यातील जबरदस्त अभिनय क्षमतेने लोकांच्या मनात धडकी भरविली. त्यामुळेच त्यांना आजही बॉलिवूडमधील बेस्ट खलनायक म्हणून ओळखले जाते. जगाचा निरोप घेतलेला हा खलनायक जर आज आपल्यात असता तर आज ८५ वर्षांचा झाला असता. अमरिश यांचा बॉलिवूड प्रवास खूपच कष्टदायी आहे. एलआसीची नोकरी करून त्यांनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. 



जेव्हा त्यांना फारसे चित्रपट मिळत नव्हते तेव्हा त्यांनी एलआयसीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. नोकरी करीत असताना ते पृथ्वी थिएटरमध्ये काम करीत होते. पुढे ते टीव्हीवर जाहिरातींमध्ये झळकू लागले. या जाहिरातींमुळेच त्यांना चित्रपटांचे दरवाजेही उघडले गेले. वयाच्या ३९व्या वर्षी त्यांना चित्रपटात संधी मिळाली. सुनील दत्त, वहिदा रहमान स्टारर ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटात त्यांनी रहमत खान नावाच्या व्यक्तीची पहिली भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांना खलनायकाच्याच भूमिका मिळत गेल्या. अमरिश पुरी यांनी खलनायक म्हणून अनेक दमदार भूमिका साकारल्या. चित्रपटातील त्यांचा वेगवेगळा गेटअप प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवित होता. ‘अजुबा’मध्ये वजीर-ए-आला, ‘मि. इंडिया’मध्ये मोगॅँबो, ‘नगिना’मध्ये भैरवनाथ, ‘तहलका’मध्ये जनरल डोंग या त्यांच्या अविस्मरणीय भूमिका प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत. 



अमरिश पुरी यांचा बाल्ड लुक बºयाचशा चित्रपटांमध्ये बघावयास मिळाला होता. मात्र पहिल्यांदा ते हॉलिवूड चित्रपट ‘इंडियन जोन्स अ‍ॅण्ड द टेंपल आॅफ डूम’ या चित्रपटात टक्कल केलेल्या लुकमध्ये बघावयास मिळाले होते. या चित्रपटात त्यांनी मोला रामची भूमिका साकारली होती. अमरिश पुरी यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात मराठी चित्रपटातून केली होती, हे खूपच कमी लोकांना माहीत आहे. १९६७ मध्ये आलेल्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या चित्रपटात त्यांनी पहिली भूमिका साकारली होती. चित्रपटात त्यांनी आंधळ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. 



अमरिश यांनी १९६७ ते २००५ मध्ये ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. २००६ मध्ये (निधनानंतर) रिलीज झालेला ‘कच्ची सडक’ हा चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. अमरिश पुरी यांनी हिंदी व्यतिरिक्त कन्नड, मराठी, पंजाबी, मल्याळम, तेलगू, तामिळ आदी भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले. त्याचबरोबर हॉलिवूडपटातही त्यांनी काम केले. मात्र त्यांना खरी ओळख ती हिंदी चित्रपटांनीच मिळवून दिली. अमरिश पुरी यांना हॅटची खूपच आवड होती. त्यामुळेच त्यांच्या कलेक्शनमध्ये दोनशेपेक्षा अधिक देशी-विदेशी हॅट होत्या. 



२२ जून १९३२ मध्ये पंजाबमधील लाहोरमध्ये (आताचे पाकिस्तान) जन्मलेल्या अमरिश यांनी इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल अ‍ॅक्टर म्हणून सुरुवात केली होती. बॉलिवूडमधील त्यांचे योगदान न विसरणारे आहे. १२ जानेवारी २०१५ मध्ये ब्रेन हमरेजमुळे त्यांचे मुंबई येथे निधन झाले. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता, तेव्हा अनेक वृत्तपत्रांमध्ये ‘मोगॅँबो खामोश हुआ’ या मथळ्याखाली त्यांच्या निधनाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली. त्यांच्या निधनामुळे जगभरातील फॅन्सला धक्का बसला होता. 

Web Title: Amarish Puri, who is a LIC agent, has started acting from Marathi film.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.