ठळक मुद्देरंजीता यांनी म्हटले आहे की, आमचा अमेरिकेत व्यवसाय असून त्या व्यवसायावरून माझ्या पतीत आणि मुलात वाद झाला होता. त्या दिवशी माझ्या पतींना प्रचंड राग आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. पण आता या वादावर आम्ही सामोपचाराने मार्ग काढला आहे.  

अभिनेत्री रंजीताने लैला मजनू, अखियों के झरोको से, पती पत्नी और वो, तेरी कसम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ ४७ चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांच्या अभिनयामुळे आजही त्या प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या जिंदगी तेरे नाम या चित्रपटात त्या शेवटच्या झळकल्या होत्या. त्यानंतर त्या अभिनयक्षेत्रापासून दूरच आहेत. पण आता एका वेगळ्याच कारणासाठी त्या चर्चेत आल्या आहेत. 

 

रंजीता यांचे राज मसंद यांच्यासोबत लग्न झाले असून त्यांना स्काय हा मुलगा आहे. रंजीता यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी त्यांचे पती राज मसंद यांनी तक्रार नोंदवली होती. पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार, रंजीता यांनी मारहाण केल्याचे त्यांच्या पतीने म्हटले होते. त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले होते की, रंजीता आणि मुलगा स्कायने मारहाण करून माझ्याकडून पैसे उकळले होते. 

रंजीता अनेक वर्षं आपल्या कुटुंबियांसोबत अमेरिकेत राहात होत्या. पण आता त्या, मुलगा आणि पती समवेत पुण्यातील कोरेगाव पार्क या परिसरात राहातात. पण संपत्तीच्या वादातून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

रंजीता यांच्या पतीने पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर आता त्यांच्या पतीनेच आमच्यातील वाद मिटला असल्याचे स्पष्ट केले आहे.  त्यांच्या पतीने म्हटले आहे की, माझ्या मुलात आणि माझ्यात वाद झाल्यानंतर तो आक्रमक झाला होता. पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आमच्यातील सगळे वाद मिटले आहेत तर या प्रकरणात रंजीता यांनी म्हटले आहे की, आमचा अमेरिकेत व्यवसाय असून त्या व्यवसायावरून माझ्या पतीत आणि मुलात वाद झाला होता. प्रत्येक कुटुंबात काही ना काही वाद हे होत असतातच. पण त्या दिवशी माझ्या पतींना प्रचंड राग आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. पण आता या वादावर आम्ही सामोपचाराने मार्ग काढला आहे.  


Web Title: All is well, insists yesteryear actress Ranjeeta Kaur’s husband after alleging abuse by the wife and son
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.