​प्रियकराच्या घरातून श्रद्धा कपूरला फरफटत घरी नेल्याच्या सर्व अफवा : शक्ती कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2016 01:06 PM2016-12-30T13:06:41+5:302016-12-30T13:19:21+5:30

श्रद्धा कपूर सध्या तिच्या चित्रपटापेक्षा खासगी जीवनातील स्कँडलमुळेच जास्त चर्चेत आहे. तिचे आणि ‘रॉक आॅन २’ को-स्टार फरहान अख्तरचे ...

All the rumors of Shraddha Kapoor taking home from home: Shakti Kapoor | ​प्रियकराच्या घरातून श्रद्धा कपूरला फरफटत घरी नेल्याच्या सर्व अफवा : शक्ती कपूर

​प्रियकराच्या घरातून श्रद्धा कपूरला फरफटत घरी नेल्याच्या सर्व अफवा : शक्ती कपूर

googlenewsNext
रद्धा कपूर सध्या तिच्या चित्रपटापेक्षा खासगी जीवनातील स्कँडलमुळेच जास्त चर्चेत आहे. तिचे आणि ‘रॉक आॅन २’ को-स्टार फरहान अख्तरचे अफेयर गाजत असताना प्रेमात आंधळी झालेली श्रद्धा त्याच्या घरी लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी गेली.

मुलीच्या अशा वागण्याने चिडलेले तिचे वडील शक्ती कपूर यांनी तिला फरफटत घरी नेल्याची बातमी पसरली. मात्र या सर्व अफवा असून श्रद्धा आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शक्ती कपूर यांनी खुलासा केला.

माध्यमांच्या रिपोर्टनुसार, आईवडिलांचा विरोध झिडकारून ती फरहानच्या घरी राहण्यासाठी गेली होती. तिला घरी परत नेण्यासाठी रविवारी शक्ती कपूर व पद्मिनी कोल्हापुरे तेथे पोहचले. यावेळी या तिघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. परंतु वडिलांच्या दबावाखाली श्रद्धाला माघार घ्यावी लागली.

या प्रकरणावर शक्ती कपूर म्हणाले की, ‘मीडियामध्ये जे काही बोलले जातेय ते संपूर्णपणे खोटे आणि निरर्थक असून कृपया त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. श्रद्धाची इमेज खराब करण्यासाठी कोणीतरी अशा अफवा पसरवत आहे. गेली ३५ वर्षे मी या इंडस्ट्रीमध्ये सक्रीय असून अशा गोष्टींचा मला चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे यावर प्रतिक्रया देण्यास मी उत्सुक नाही.’

Farhan Akhtar with Shraddha Kapoor
अब बगावत होगी : फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर

विशेष म्हणजे यावेळी त्यांनी जाणूनबुजून श्रद्धा-फरहानच्या प्रेमसंबंधावर भाष्य करणे टाळले. दोघांच्या वयातील अंतर जास्त असल्यामुळे त्यांचा या नात्याला विरोध आहे. तसेच त्याला दोन मुले असून त्याची पत्नी अधुना त्याच्यापासून वेगळी राहते; मात्र त्यांचा घटस्फोट झालेला नाही.

काही दिवसांपूर्वी फरहान-श्रद्धा अर्जुन रामपवर व त्याची पत्नी मेहर जेसियासोबत डबल डेटवर गेले होते. श्रद्धाचे नाव यापूर्वी ‘आशिकी २’ को-स्टार आदित्य रॉय कपूरशी जोडले गेले होते. लवकरच त्यांचा ‘ओके  जानू’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

Web Title: All the rumors of Shraddha Kapoor taking home from home: Shakti Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.