ठळक मुद्देपार्टीत मलायकाने मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले असल्याने तिला स्वतःला सांभाळणे कठीण जात होते. त्यावेळी सोनम तिला मदत करण्यासाठी गेली होती. पण सोनमची मदत घेण्याऐवजी तू दूर राहा असे तिने सोनमला सगळ्यांच्या समोर सुनावले होते.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे नाते मीडियासमोर देखील मान्य केले आहे. ते दोघे अनेकवेळा एकमेकांसोबत फिरताना दिसतात. एवढचे नव्हे तर तर आता फोटोग्राफर्सना पाहून ते फोटोसाठी पोझदेखील देतात. अर्जुनच्या इंडियाज मोस्ट वाँटेड या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या प्रिमियरला देखील मलायका आवर्जून उपस्थित होती. अर्जुन आणि मलायकाचे कपल त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडत असून त्यांचे फॅन्स त्या दोघांच्या प्रेमात पडले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

अर्जुन कपूरची चुलत बहीण सोनम कपूरला एकेकाळी मलायका अरोरा आवडत नव्हती. तिला मलायका न आवडण्यामागे एक खास कारण होते. पण आता मलायका आणि सोनममध्ये पॅचअप झाले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण मलायका आणि अर्जुन दोघांनी नुकतेच जोडीने सोनमच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली. एवढेच नव्हे तर एखाद्या संस्कारी सूनेप्रमाणे तिने या पार्टीला साडी नेसली होती. यावरून तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल देखील करण्यात आले होते. 

पण तुम्हाला माहीत आहे का, अर्जुनची चुलत बहीण सोनम कपूर आणि मलायका अरोरा यांच्यात सगळे काही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. स्पॉटबॉय या वेबसाईटने दिलेल्या वृ्त्तानुसार काही वर्षांपूर्वी मलायका अरोरा मनिष मल्होत्राच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला गेले होते. या पार्टीत तिने मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले असल्याने तिला स्वतःला सांभाळणे कठीण जात होते. त्यावेळी सोनम तिला मदत करण्यासाठी गेली होती. पण सोनमची मदत घेण्याऐवजी तू दूर राहा असे तिने सोनमला सगळ्यांच्या समोर सुनावले होते. मलायका कोणाचेच ऐकायला तयार नव्हती. मी स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते असे ती सोनमला म्हणाली होची आणि हीच गोष्ट सोनमला आवडली नसल्याचे म्हटले जात होते.

मलायका दारूच्या नशेत असल्याने ती काय करतेय हेच तिला कळत नव्हते. अखेरीस या पार्टीचा होस्ट करण जोहर आणि मनिष मल्होत्राने मलायकाला शांत केले आणि ते दोघे तिला दुसरीकडे घेऊन गेले होते. 


Web Title: All is not well between Sonam Kapoor and Malaika Arora?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.