Aliya Bhat got the reason for the demise of Madhuri Dixit | आलिया भटला या कारणासाठी मिळाली माधुरी दीक्षितच्या कौतूकाची थाप
आलिया भटला या कारणासाठी मिळाली माधुरी दीक्षितच्या कौतूकाची थाप

दिग्दर्शक करण जोहरचा बहुप्रतिक्षीत व बहुचर्चित चित्रपट 'कलंक'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन शिगेला पोहचली. नुकतेच या सिनेमातील 'घर मोरे परदेसीया' हे गाणे रिलीज करण्यात आले. या चित्रपटातील रुपवती म्हणजेच अभिनेत्री आलिया भटने या गाण्यात कथ्थक नृत्य सादर केले आहे. या गाण्यातून तिने प्रेक्षकांचेच नाही तर खुद्द बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे देखील मन जिंकले आहे.

'घर मोरे परदेसीया' या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन रेमो डिसुझाने केले असून हे गाणे माधुरी दीक्षित व आलिया भट यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात आलिया कथ्थक करताना दिसते आहे.

माधुरी समोर नृत्य करताना दडपणाखाली असल्याचे आलियाने नुकतेच पिपींगमूनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. या मुलाखतीत आलिया म्हणाली की, “माधुरीजी यावेळेस नाचत नव्हत्या. पण माझ्या मनावर दडपण कायम होते. पण माझ्या ह्या अवस्थेची त्यांना  कल्पना आली आणि मला खूप सहकार्य केले. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण गाणे संपल्यावर डबल थम्पसअप करत मला त्यांनी दाद दिली आणि मी भरुन पावले.”

'कलंक' या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, साजिद नाडियादवाडा व फॉक्स स्टार स्टुडिओजने केले आहे. या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. 


Web Title: Aliya Bhat got the reason for the demise of Madhuri Dixit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.