alia varun film kalank disappointing public funny memes viral on social | Kalank Memes Viral: ‘कलंक’ पाहून युजर्स म्हणाले,  ‘तबाह हो गये...’!! 

Kalank Memes Viral: ‘कलंक’ पाहून युजर्स म्हणाले,  ‘तबाह हो गये...’!! 

ठळक मुद्दे‘कलंक’पेक्षा ‘कलंक’वरचे हे विनोदी मीम्स अधिक मनोरंजन करणारे आहेत.

वरूण धवन, आलिया भट, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर या सर्वांच्या अभिनयाने सजलेला ‘कलंक’ हा मल्टिस्टारर चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाने समीक्षकांची निराशा केली. प्रेक्षकांनी चित्रपट पाहून संमिश्र प्रतिसाद दिला. तूर्तास ‘कलंक’वरून सोशल मीडियावर मजेदार मीम्सचा पूर आला आहे.
सोशल मीडिया युजर्सनी या चित्रपटाची तुलना शाहरूख खानच्या ‘झिरो’शी केली आहे. ‘कलंक’ हा अतिशय कंटाळवाणा आणि सुमार चित्रपट असल्याचे सांगत अनेक युजर्सनी चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. ‘कलंक’ पाहून माझे ३७५ रूपये फुकट गेलेत, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. ‘नहीं बचेगा मैं इधर, मर जाएगा मैं इधर ही...’, अशा शब्दांत काहींनी या चित्रपटाचे वर्णन केले आहे.
माधुरी दीक्षितवर चित्रीत करण्यात आलेले ‘तबाह हो गये’ या गाण्यावरूनही युजर्सनी फनी मीम्स तयार केले आहेत. आलिया व वरूण या दोघांचीही युजर्सने प्रचंड टर उडवली आहे.
एकंदर काय तर हे ‘कलंक’पेक्षा ‘कलंक’वरचे हे विनोदी मीम्स अधिक मनोरंजन करणारे आहेत. तेव्हा एकदा बघाच...

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: alia varun film kalank disappointing public funny memes viral on social

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.