ठळक मुद्देआलिया व आकांक्षा यांची मैत्री किती घट्ट आहे, याचा अंदाज दोघींचेही सोशल अकाऊंट बघितल्यावर येते.

आलिया भटसोबत सर्रास दिसणारी तिची बेस्ट फ्रेन्ड लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. आलियाची बेस्ट फ्रेन्ड दुसरी कुणी नसून आकांक्षा रंजन कपूर आहे. आलिया व आकांशा अतिशय घट्ट मैत्रिणी आहेत. आता आलियाची हीच जवळची मैत्रिण एका म्युझिक व्हिडीओत दिसणार आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायक अंकित तिवारीच्या ‘तेरे दो नैना’ या म्युझिक व्हिडीओत आकांक्षा झळकणार आहेत. यात ती अभिनेता अपारशक्ती खुराणासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल. अलीकडे लखनौत या गाण्याचे शूटींग पार पडले.


आकांक्षासाठी ही संधी निश्चितपणे स्वप्नवत होती. एका मुलाखतीत ती यावर बोलली. हा पहिला अनुभव एखाद्या सुंदर स्वप्नासारखा होता. हे गाणे मी ऐकले आणि ऐकताक्षणी मला आवडले. अपारशक्ती तर माझा चांगला मित्र बनला, असे तिने सांगितले.
या म्युझिक व्हिडीओसाठी आलियाकडून काही टीप्स घेतल्या का? असे विचारले असता, मी टीप्स वगैरे घेण्याच्या भानगडीत पडले नाही. कारण मी फार विचार करत नाही. दिग्दर्शकाने जे सांगितले, त्यावर मी फोकस केला, असे ती म्हणाली.


आलिया व आकांक्षा यांची मैत्री किती घट्ट आहे, याचा अंदाज दोघींचेही सोशल अकाऊंट बघितल्यावर येते. दोघींचेही सोशल अकाऊंट या फोटोंनी भरलेले आहे. अलीकडे आलियाची दुसरी एक मैत्रिण कृपा मेहताचे लग्न झाले होते. या लग्नातही आलिया व आकांक्षा एकत्र दिसल्या होत्या. आलियाची बीबीएफ आकांक्षाची एक नवी सुरुवात झाली आहे. या प्रवासात बेस्ट फ्रेन्ड आलियाची तिला किती मदत होते, ते बघूच. तूर्तास आकांक्षा व आलियाचे हे फोटो पाहुयात.


Web Title: alia bhatts best friend akansha ranjan kapoor is all set for her acting debut
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.