​ आलिया भट्टच्या होकाराने सुखावला विकी कौशल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2017 05:15 AM2017-06-25T05:15:14+5:302017-06-25T10:45:14+5:30

‘स्टुडंट आॅफ दी इअर’मध्ये ‘स्टुडंट’ बनलेली आलिया, ‘उडता पंजाब’मध्ये एक पंजाबी कुडी बनली, ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’मध्ये उत्तर प्रदेशची मुलगी ...

Alia Bhatt sukawala wiki skill! | ​ आलिया भट्टच्या होकाराने सुखावला विकी कौशल!

​ आलिया भट्टच्या होकाराने सुखावला विकी कौशल!

googlenewsNext
्टुडंट आॅफ दी इअर’मध्ये ‘स्टुडंट’ बनलेली आलिया, ‘उडता पंजाब’मध्ये एक पंजाबी कुडी बनली, ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’मध्ये उत्तर प्रदेशची मुलगी बननी. आता आगामी चित्रपटात आलिया कुठली भूमिका साकारणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तर मेघना गुलजारच्या ‘राजी’ या आगामी चित्रपटात आलिया एका काश्मिरी मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे.  यात आलियाच्या अपोझिट विकी कौशलची वर्णी लागली आहे. तूर्तास विकी यामुळे जाम खूश आहे. सध्याच्या सगळ्यात आघाडीच्या अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आलियासोबत काम करण्यासारखा दुसरा आनंद कुठलाच असू शकत नाही, असे विकीने म्हटले आहे. आलियाने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अगदी करिअरच्या पहिल्या टप्प्यात तिने केलेले काम अद्भूत आहे. तिच्याकडून मी बरेच काही शिकेल आणि तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव मजेशीर असेल, असा मला विश्वास आहे. ‘राजी’ हा चित्रपट हिरंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या नॉवेलवर आधारित आहे, याचाही मला आनंद असल्याचे विकीने म्हटले आहे.



करण जोहरने आलियाच्या या  भूमिकेबद्दलचे काही डिटेल्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. धर्मा मुव्हीज आणि जंगली पिक्चर्स निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटात आलिया भट्ट दिसणार आहे,असे करणने लिहिले आहे.आतापर्यंत आलियाने नटखट बबली टाइपच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र ती पहिल्यांदाच एका विवाहित महिलेची भूमिका साकारणार असून, पाकिस्तानी नवरीच्या भूमिकेत ती झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पंजाब, काश्मीर आणि मुंबई या तीन शहरांमध्ये होणार आहे.  

Web Title: Alia Bhatt sukawala wiki skill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.