ठळक मुद्देदोघांना एकत्र एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहेरॅपअपच्या तीन दिवस आधीच रणवीर तिला घेऊन मुंबईत परतला

आलिया भट आणि रणबीर कपूर सध्या आपल्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेच आहे. सध्या ते 'वाराणसी'मध्ये आगामी सिनेमा  'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. मात्र स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार शूटिंग संपण्याच्या तीन दिवस आधी दोघे मुंबईत परतले आहेत. दोघांना एकत्र एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार आलियाची तब्येत बिघडल्याने रणबीर तिला घेऊन मुंबईत परतला आहे.

  

बनारसमध्ये रणबीर आणि आलिया 'ब्रह्मास्त्र'ची शूटिंग करत होते त्याच दरम्यान अचानक आलियाची तब्येत बिघडली. त्यामुळे रॅपअपच्या तीन दिवस आधीच रणवीर तिला घेऊन मुंबईत परतला. आलिया काहीकाळ आराम करुन उरलेले शूटिंग पूर्ण करणार आहे. रिपोर्टनुसार आलिया-रणबीर तीन दिवसांमध्ये एका गाण्याचे शूटिंग करणार होते.

मात्र आता हे गाणं नोव्हेंबरमध्ये शूट करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार तब्येत बिघडल्यानंतर ही आलिया शूटिंग करत होती. मात्र दिग्दर्शक अयान मुखर्जीने आलियाच्या बिघडलेल्या तब्येतीकडे बघत शूटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबरमध्ये संपूर्ण टीम पुन्हा एकदा वाराणसीमध्ये जाऊन गाणं शूट करणार आहे.      


‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या निमित्ताने रणबीर व आलिया भट्ट पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.  (‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या.  )‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर आलियासह, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात एक सुपरहिरोची कथा पाहायला मिळणार आहे.


Web Title: Alia Bhatt Ranbir Kapoor return spotted at airport after coming from varanasi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.