‘गिल्टी’तून डेब्यू करतेय आलिया भटची ही BFF, क्रिकेटरसोबत जुळले होते नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 10:36 AM2020-02-20T10:36:02+5:302020-02-20T10:36:10+5:30

नेटफ्लिक्सची ओरिजनल फिल्म ‘गिल्टी’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. याच ट्रेलरमधील आणखी एक चेहरा लोकांच्या नजरेत भरला.

alia bhatt best friend akansha ranjan kapoor debut from netflix film guilty | ‘गिल्टी’तून डेब्यू करतेय आलिया भटची ही BFF, क्रिकेटरसोबत जुळले होते नाव

‘गिल्टी’तून डेब्यू करतेय आलिया भटची ही BFF, क्रिकेटरसोबत जुळले होते नाव

googlenewsNext
ठळक मुद्दे शशी रंजन व अनु रंजनची लेक असलेली आकांक्षा अलीकडे अपारशक्तीसोबत ‘तेरे नैना’ या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती.

नेटफ्लिक्सची ओरिजनल फिल्म ‘गिल्टी’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिचा हटके अवतार चर्चेचा विषय ठरला. याच ट्रेलरमधील आणखी एक चेहरा लोकांच्या नजरेत भरला. तो म्हणजे आकांक्षा रंजन कपूर हिचा. आकांक्षा ‘गिल्टी’द्वारे डिजिटल डेब्यू करतेय. आकांक्षाचे नाव याआधीही तुम्ही ऐकले असेल. होय, ही आकांक्षा म्हणजे तिच ती आलिया भटची बेस्ट फ्रेन्ड.


आलिया व आकांक्षा दोघीही बालपणीपासूनच्या मैत्रिणी आहेत. आलिया व आकांक्षा यांची मैत्री किती घट्ट आहे, याचा अंदाज दोघींचेही सोशल अकाऊंट बघितल्यावर येते. दोघींचेही सोशल अकाऊंट या फोटोंनी भरलेले आहे. अलीकडे आलियाची दुसरी एक मैत्रिण कृपा मेहताचे लग्न झाले होते. या लग्नातही आलिया व आकांक्षा एकत्र दिसल्या होत्या. ‘गिल्टी’चा ट्रेलर रिलीज झाल्यावरही आलियाने पोस्ट केली. ‘वाह, काय ट्रेलर आहे. माझी बेस्ट फ्रेन्ड आकांक्षाला बघा,’ असे तिने लिहिले. 


मध्यंतरी आकांक्षा क्रिकेटर के. एल. राहुल यांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनाही अनेकदा डिनर, मुव्हीज डेटवर एकत्र पाहिले गेले होते. अर्थात कालांतराने या बातम्या अफवा सिद्ध झाल्यात. कारण यानंतर लगेच के. एल. राहुल आकांक्षा नाही तर सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिला डेट करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्यात.


आकांक्षा ही पेशाने मॉडल आहे. शशी रंजन व अनु रंजनची लेक असलेली आकांक्षा अलीकडे अपारशक्तीसोबत ‘तेरे नैना’ या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. याशिवाय टीव्हीवर डिकोडेड नावाचा फॅशन शोही तिने होस्ट केला आहे.

Web Title: alia bhatt best friend akansha ranjan kapoor debut from netflix film guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.