Alia Bhat's big disclosure about marriage, who was married to Aliya? | लग्नाबाबत आलिया भटचा मोठा खुलासा, कुणाशी केलं आलियाने लग्न?
लग्नाबाबत आलिया भटचा मोठा खुलासा, कुणाशी केलं आलियाने लग्न?

ठळक मुद्दे ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर रणबीर - आलिया एकमेकांत गुंतले असल्याच्या चर्चा रंगल्या. आलियानेही एका क्षणाचाही विलंब न करता तिने सांगितले की, माझं लग्न झालेले आहे. ‘कॉफी विद करण 6’मध्ये लग्नाबद्दल भरभरून बोलताना दिसली होती.

आलिया भट सध्या रणवीर  कपूरसह असलेल्या अफेअरमुळे चर्चेत आहे. त्यामुळे आलिया जिथे जाणार तिथे फक्त आता आलियाचे रणवीर कपूरसह असलेले अफेअर कधी मान्य करणार याकडेच सा-यांच्या नजरा लागलेल्या असतात. या दोघांचे अफेअरबाबत आलियाने मौन पाळले असले तरी एका कार्यक्रमात आलिया दिसताच तिला पुन्हा रणवीर कपूरविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर आलियानेही एका क्षणाचाही विलंब न करता तिने सांगितले की, माझं लग्न झालेले आहे. आलियाचे उत्तर ऐकून सा-यांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. पण वारंवार विचारण्यात येणा-या प्रश्नांना वैतागुन आलियाने असे उत्तर दिल्याचेही स्पष्ट झाले. तर दुसरीकडे आलियाने थेट लग्न झाल्याचे सांगितल्यामुळे तिलाही लग्नाचे वेध लागले असल्याचे चर्चा रंगत आहेत. त्यामुळे आलियानेही इतर अभिनेत्रींप्रमाणे लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटू नये. 

 ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर रणबीर - आलिया एकमेकांत गुंतले असल्याच्या चर्चा रंगल्या. इतकेच नव्हे तर सतत एकत्र वेळ घालवताना दिसायचे. त्यामुळे यांच्यात प्रेमाचे नाते निर्माण झाल्याचे जगजाहीर झाले आहे. अफेअरनंतर आता दोघेही कधी लग्न करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ‘कॉफी विद करण 6’मध्ये आलियाने हजेरी लावली होती. शोच्या निर्मात्यांनी आलियाचा एक अनसीन व्हिडीओ रिलीज केला होता.यात आलिया लग्नाबद्दल भरभरून बोलताना दिसली होती. 


Web Title: Alia Bhat's big disclosure about marriage, who was married to Aliya?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.