बॉलिवूडची क्युट गर्ल आलिया भट नुकतीच मुंबई एअरपोर्टवर तिची आई सोनी राजदानसोबत दिसली. एअर पोर्टवर आलिया भटच्या लुकसोबत तिच्या बॅगेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.


एअरपोर्टवर आलिया पर्पल ट्रॅक सूटमध्ये दिसली. या ट्रॅक सूटसोबत तिने व्हाईट शर्ट व शूज परिधान केले होते. तर तिची आई सोनी राजदान यांनी प्रिंटेड शर्ट व पॅण्ट घातली होती.यावेळी आलियाच्या हातात पिवळ्या रंगाची बॅग होती. या बॅगेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या बॅगेची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल. या बॅगेची किंमत १, ६१, ०४३ रुपये इतकी आहे.


आलियाच्या कामाबद्दल सांगायचं तर तिने आतापर्यंत विविध भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. अल्पावधीतच तिने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. सध्या ती तिचा आगामी चित्रपट ब्रह्मास्त्रच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 


आलिया अभिनयाशिवाय सिंगिंगमध्ये देखील कुशल आहे. यापूर्वी देखील आलियानं चित्रपटात गाणं गायलं आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आलिया महेश भट दिग्दर्शित सडक २मध्ये गाणं गाणार आहे.

सडक २च्या निमित्ताने आलिया वडील महेश भट, बहिण पूजा भट सोबत पहिल्यांदाच काम करणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली असून या चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्युलचं शूटिंग उटीमध्ये होणार आहे.

याशिवाय आलिया संजय लीला भन्साळींच्या इंशाअल्लाहमध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून ती पहिल्यांदाच सलमान खानसोबत रोमांस करताना दिसणार आहे.


Web Title: Alia Bhat Bag is too costly
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.