यश राज फिल्म्समध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात करणारे अली अब्बास जफरची गणना आज बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांमध्ये होते. शुक्रवारी त्याची पहिली वेबसिरिज 'तांडव' रिलीज होणार आहे. सैफ अली खानने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, पटौदी पॅलेस पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटात किंवा मालिकेतही दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच अली अब्बास जाफर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याची पत्नी एक फ्रेंच मॉडेल आहे. भारत या चित्रपटात एका गाण्यात दिशा पटानीसोबत नृत्य करताना त्याची पत्नी दिसली होती. लग्नानंतर अली अब्बास जफरने हनीमूनला जाण्याऐवजी त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट तो ओटीटी नेटफ्लिक्ससाठी बनवित आहे. लग्नानंतर तो लगेच आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी झाला आहे. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार 21 फेब्रुवारीपर्यंत शूटिंग सुरु राहणार आहे. त्याच्या जवळच्या मित्रांचे म्हणणे आहे की याच कारणामुळे तो हनिमूनला जाऊ शकला नाही.

अली अब्बास जाफरच्या पत्नीचे नाव अलिशिया असून अलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्याविषयी सांगितले आहे. अली सांगतो, आम्ही लग्न २०२२ मध्ये करण्याचे ठरवले होते. पण माझे आई-वडील व्यस्कर झाले आहेत.

त्याच्यात त्यांना काही महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. हे सगळे पाहाता आम्ही लवकर लग्न करण्याचे ठरवले. अलिशियासोबत माझी ओळख टायगर जिंदा है या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ती लग्नाला जोपर्यंत होकार देत नाही, तोपर्यंच मी तिला सतत लग्नासाठी विचारतच होतो.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ali abbas zafar starts shooting for his next film after marriage with alicia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.