अक्षय कुमारचा ऑनस्क्रीन मुलगा आता बघा दिसतो कसा, हँडसम अभिनेत्यांमध्ये होते त्याची गणना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:46 PM2021-09-28T12:46:03+5:302021-09-28T12:56:48+5:30

“शकलाका बूम बूम”, “एक अन्य से कर्ते है प्यार हम” “सोनपरी”, “बडे अच्छे लगते हैं” सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकेतल्या आदित्यने साकारलेल्या सगळ्याच भूमिका आजही चाहत्यांच्या चांगल्याच लक्षात असतील.

Akshay Kumar's Onscreen son is turned in to handsome hunk, check how Aditya Kapadia looks now | अक्षय कुमारचा ऑनस्क्रीन मुलगा आता बघा दिसतो कसा, हँडसम अभिनेत्यांमध्ये होते त्याची गणना

अक्षय कुमारचा ऑनस्क्रीन मुलगा आता बघा दिसतो कसा, हँडसम अभिनेत्यांमध्ये होते त्याची गणना

googlenewsNext

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे जुने सिनेमा असो किंवा नवीन सिनेमा त्यांची चर्चा नाही झाली तरच नवल. १९९९ मध्ये झळकलेला 'जानवर' सिनेमा अक्षय कुमारच्या फिल्मी करिअरला खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट ठरला. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्याने केलेले सिनेमांना फारसे यश मिळाले नव्हते. अधिकतर सिनेमे फ्लॉप व्हायचे. मात्र जानवर हा सिनेमा हिट ठरला आणि तिथूनच अक्षय कुमारच्या करिअरची गाडीही सुस्साट धावू लागली. 

सिनेमात बालकलाकार आदित्य कपाडियाचेही खूप कौतुक झाले होते. त्याच्या भूमिकेने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. सिनेमातले बालकलाकार आता कसे दिसत असतील? काय करत असतील हे जाणून घेण्यात अनेकदा चाहत्यांना उत्सुकता असते. इंटरनेटवर आदित्यचेही फोटो व्हायरल होत असतात. लहानपणी जितको तो क्युट दिसायचा तितकाच आता तो  खूप हँडसम दिसतो. आतापर्यंत अनेक सिनेमात तो झळकला आहे. बालकलाकार म्हणून झळकलेला आदित्य आता सिनेमात झळकण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

टीव्ही शो “जस्ट मोहब्बत” पासून तो प्रकाशझोतात आला होता. आदित्यने “शकलाका बूम बूम”, “एक अन्य से कर्ते है प्यार हम” “सोनपरी”, “बडे अच्छे लगते हैं” सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकेतल्या आदित्यने साकारलेल्या सगळ्याच भूमिका आजही चाहत्यांच्या चांगल्याच लक्षात असतील.

 

या सगळ्यांमध्ये सुपरहिट ठरली ती 'सोनपरी' आणि 'शक लाका बूम बूम' मालिका. बच्चेकंपनीची ही मालिका आवडती मालिका होती. मालिकेत झळकल्यामुळे आदित्यला घराघरात प्रसिद्धी मिळाली. 

 

टीव्ही आणि सिनेमा या दोन्ही माध्यमात त्याने काम केल्यामुळे चाहत्यांसाठी आदित्य हा नवीन नाही. त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.आता पुन्हा एकदा अभिनेता म्हणून त्याला सिनेमात झळकायचे वेध लागले आहेत. अजूनतरी हवी तशी संधी त्याला मिळाली नसली तरी लवकरच त्याला आवडीची भूमिका साकारायला मिळेल अशी आशा करुयात.

 

सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रीय असतो. त्याचे एकसे बढकर एक फोटो व्हिडीओ तो शेअर करत असतो. इतकेच काय तर सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्याही अधिक आहे. 
 

Web Title: Akshay Kumar's Onscreen son is turned in to handsome hunk, check how Aditya Kapadia looks now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.