बापरे! ‘अतरंगी रे’च्या दोन आठवड्याच्या शूटिंगसाठी अक्षय कुमारने घेतले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 08:00 AM2020-07-25T08:00:00+5:302020-07-25T08:00:03+5:30

अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी म्हणतात, ते उगाच नाही. 

akshay kumar taking whopping amount of twenty seven crores for two week shooting in atrangi rey |  बापरे! ‘अतरंगी रे’च्या दोन आठवड्याच्या शूटिंगसाठी अक्षय कुमारने घेतले इतके कोटी

 बापरे! ‘अतरंगी रे’च्या दोन आठवड्याच्या शूटिंगसाठी अक्षय कुमारने घेतले इतके कोटी

googlenewsNext
ठळक मुद्दे‘अतरंगी रे’ या सिनेमात सारा अली खान व साऊथ सुपरस्टार धनुष हे मुख्य भूमिकेत आहेत.

अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी म्हणतात, ते उगाच नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अक्षयची क्रेज कायम आहे. एकापाठोपाठ एक अशा त्याच्या हिट सिनेमांचा धमाका सुरु आहे. 2019 मध्ये अक्षयने अनेक सिनेमे रिलीज झालेत. यंदाही त्याचे अनेक सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सूर्यवंशी, लक्ष्मी बॉम्ब, बेल बॉटम, बच्चन पांडे, पृथ्वीराज शिवाय अतरंगी रे.   तर आता अक्षयच्या ‘अतरंगी रे’ या  आगामी सिनेमाबद्दलची बातमी आहे. या सिनेमात अक्षय स्पेशल भूमिकेत आहेत. म्हणजे त्याची भूमिका फार मोठी नाही. यासाठी अक्षयला केवळ 2 आठवडे शूट करावे लागेल.मात्र दोन आठवड्याच्या शूटींगसाठी अक्षयने किती मानधन घ्यावे? तर आधीच्या मानधनापेक्षा दुप्पट. होय, 27 कोटी.

होय, केवळ दोन आठवड्याच्या शेड्यूलसाठी अक्षयने 27 कोटी मानधन घेतल्याचे कळतेय. अक्षय कुमार साधारण एका दिवसाच्या शूटिंगसाठी साधारणत: 1 कोटी रुपये मानधन घेतो. मात्र यावेळी त्याने ही रक्कम जवळपास दुप्पट केली आहे. अक्षय कुमार 9 हा आकडा लकी मानतो. त्यामुळे मानधन सुद्धा तो याच आकड्याशी जुळणा-या संख्येने (2 +7 = 9) तो मानधन घेतो.  

‘अतरंगी रे’ या सिनेमात सारा अली खान व साऊथ सुपरस्टार धनुष हे मुख्य भूमिकेत आहेत. आनंद एल राय यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. पुढील महिन्यात अक्षय ‘बेल बॉटम’च्या शूटींगसाठी लंडनला जाणार आहे. तिथून परतल्यानंतर अक्षय ‘अतरंगी रे’चे शूटींग पूर्ण करणार आहे. हे शूटींग हातावेगळे करताच तो ‘पृृथ्वीराज चौहान’ या सिनेमात बिझी होणार आहे.
 

 

 

Web Title: akshay kumar taking whopping amount of twenty seven crores for two week shooting in atrangi rey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.