‘बच्चन पांडे’चा नवा लूक, अक्षयचा हटके अवतार पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 10:39 AM2020-01-28T10:39:53+5:302020-01-28T10:40:24+5:30

होय, ‘बच्चन पांडे’चा नवा लूक प्रदर्शित झाला आणि अक्षयचा ‘किलर’ अवतार पाहून सगळेच चकीत झालेत.

Akshay kumar share his upcoming film bachchan pandey NEW look | ‘बच्चन पांडे’चा नवा लूक, अक्षयचा हटके अवतार पाहून व्हाल थक्क

‘बच्चन पांडे’चा नवा लूक, अक्षयचा हटके अवतार पाहून व्हाल थक्क

googlenewsNext
ठळक मुद्देबच्चन पांडे’ हा चित्रपट फरहाद सामजी दिग्दर्शित करणार असून साजिद नाडियाडवाला चित्रपटाची निर्मिती करणार आहे.  

अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा नवा लूक पाहाल तर थक्क व्हाल. होय, या चित्रपटाचा नवा लूक प्रदर्शित झाला आणि अक्षयचा ‘किलर’ अवतार पाहून सगळेच चकीत झालेत. वाढलेली दाढी, जबरदस्त बॉडी, गळ्यातील सोनसाखळ्या आणि भयावह डोळे असा त्याचा अवतार आहे. या लूकमध्ये अक्षय कुमार अंत्यंत हटके अंदाजात दिसत आहे. त्याचा हा हटके लूक व्हायरल झाला आणि चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली. ‘नवा लूक, नवी रिलीज डेट’ असे त्याने हा लूक शेअर करताना लिहिले आहे. ‘बच्चन पांडे’ हा सिनेमा आता 22 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. 


आधी हा सिनेमा 2020 मध्ये नाताळच्या मुहूर्तावर रिलीज होणार होता. पण असे झाले असते तर आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’सोबत या सिनेमाचा बॉक्स ऑफिस संघर्ष अटळ होता. त्यामुळे आमिरने अक्षयला ‘बच्चन पांडे’ची रिलीज डेट बदलण्याची विनंती केली होती. आमिरच्या शब्दाखातर अक्षयने आपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलली. विशेष म्हणजे, यामुळे अक्षयला त्याच्याच आणखी एका चित्रपटाची रिलीज डेटही बदलावी लागली. होय, आता त्याचा ‘बेल बॉटम’ हा सिनेमाही 22 जानेवारीला नाही तर 2 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होईल.  


‘बच्चन पांडे’ हा चित्रपट फरहाद सामजी दिग्दर्शित करणार असून साजिद नाडियाडवाला चित्रपटाची निर्मिती करणार आहे.  
 येत्या काळात ‘सूर्यवंशी’ आणि ‘पृथ्वीराज’ हे अक्षयचे दोन सिनेमेही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षयसह कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार असून चित्रपट २७ मार्च २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Akshay kumar share his upcoming film bachchan pandey NEW look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.