सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आणि ब्लॅक अँड व्हाईट फोटोत एक मुलगा दिसतोय.  फोटोत त्याने हातात बॅडमिंटन पकडलेले दिसतेय. हा मुलगा आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. हा फोटो आहे बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचा. हा फोटो अक्षयच्या लहानपणीचा आहे. ज्यात तो खूपच क्युट दिसतोय.  अजच्या फॅन्सना त्याचा हा फोटो खूपच भावला आहे.  


गेल्या 25 वर्षांपासून अक्षय सिल्वर स्क्रिनवर राज्य करतोय. वर्षाला जवळपास 3 ते 4 सिनेमा अक्षय देतो. सिनेमा कॉमेडी असो वा देशभक्तीवर आधारित प्रत्येक ठिकाणी अक्षय आपल वेगळी छाप सोडायला विसरत नाही. अब्बास-मस्तान यांचा खिलाडी सिनेमा त्याच्या करिअरमधला सर्वात पहिला सुपरहिट सिनेमा ठरला होता. यानंतर अक्षयने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मैं खिलाडी तू अनाडी, मोहरा, सबसे बडा खिलाडी, मिस्टक एंड मिसेज खिलाडी आणि खिलाडियों का खिलाडी असे अनेक हिट सिनेमा त्यांनी दिले. 


फोर्ब्सच्या या यादीत जागतील 100 जास्त कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींच्या लिस्टमध्ये भारतातून फक्त अक्षय कुमारचे नाव सामिल आहे. 2019चा हाइस्टपेड अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये अक्षयचा 33 वा नंबर हे. त्याचा कमाई 444 कोटी इतकी आहे. अक्षयसोबत या यादीत रिहाना, स्कारलेट जॉन्सन, क्रिस इवन्स, केटी पेरी, ब्रेडली कूपर, जॅकी चॅन आणि लेडी गागा या हॉलिवूड स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. 

 


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर , अक्षय कुमारचा मिशन मंगल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होत असून या चित्रपटात अक्षयसोबतच तापसी पन्नू, विद्या बालन,  सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 


Web Title: Akshay Kumar only indian in forbes highest-paid celebrities 2019 with Rs 444 crore in a year
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.