करण जोहर सांगतोय, शाहरुख खान नव्हे तर हा अभिनेता आहे बॉलिवूडमध्ये नंबर 1 अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 07:00 AM2020-03-15T07:00:00+5:302020-03-15T07:00:02+5:30

करणनेच ही गोष्ट द कपिल शर्मा शो मध्ये सांगितली आहे.

Akshay Kumar is ‘No. 1’ actor of Bollywood, says Karan Johar on The Kapil Sharma Show PSC | करण जोहर सांगतोय, शाहरुख खान नव्हे तर हा अभिनेता आहे बॉलिवूडमध्ये नंबर 1 अभिनेता

करण जोहर सांगतोय, शाहरुख खान नव्हे तर हा अभिनेता आहे बॉलिवूडमध्ये नंबर 1 अभिनेता

googlenewsNext
ठळक मुद्देकरण जोहरने सांगितले की, अक्षय हा बॉलिवूडमधील नंबर एकचा अभिनेता आहे. मी अक्षयसोबत केलेले केसरी आणि गुड न्यूज हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरले.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्येअक्षय कुमार, कतरिना कैफ, रोहित शेट्टी आणि करण जोहर हजेरी लावणार आहेत. ते या कार्यक्रमात आपल्या सूर्यवंशी या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत.

सूर्यवंशी टीमने कपिल शर्मासोबत सेटवर खूप धमाल मस्ती केली. तसेच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गुपितं देखील कपिलला सांगितली. अक्षय कुमारसोबत लागोपाठ दोन चित्रपट करण्यामागचे कारण कपिलने करणला विचारले असता त्याने सांगितले की, “अक्षय हा बॉलिवूडमधील नंबर एकचा अभिनेता आहे. मी अक्षयसोबत केलेले केसरी आणि गुड न्यूज हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरले. त्यामुळे त्याच्यासोबत मला भविष्यातही काम करायला आवडेल. अक्षय कुमार हा प्रचंड बिझी कलाकार असला तरी या क्षेत्रात सुरू असणाऱ्या सगळ्या घडामोडींबद्दल त्याला चांगलंच माहीत असतं आणि अभिनेत्रींमध्ये करिना कपूर ही बॉलिवूडमधली सगळ्यात अपडेटेड अभिनेत्री आहे.”


 
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात करण जोहर पोलिसांवर आधारित काही चित्रपटांमधील लोकप्रिय संवाद स्वतःच्या शैलीत म्हणून दाखवणार आहे. त्यामुळे हा भाग प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार यात काहीच शंका नाही.  

Web Title: Akshay Kumar is ‘No. 1’ actor of Bollywood, says Karan Johar on The Kapil Sharma Show PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.