Akshay Kumar Movies: लैंगिक शिक्षणावर आधारित चित्रपट; Akshay Kumar ने केली मोठी घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 08:31 PM2022-12-04T20:31:53+5:302022-12-04T20:33:57+5:30

Akshay Kumar Movies: अक्षय कुमार पुन्हा एकदा सामाजिक विषयावर आधारित चित्रपट घेऊन येत आहे.

Akshay Kumar Movies: Movie based on sex education; Akshay Kumar made a big announcement | Akshay Kumar Movies: लैंगिक शिक्षणावर आधारित चित्रपट; Akshay Kumar ने केली मोठी घोषणा...

Akshay Kumar Movies: लैंगिक शिक्षणावर आधारित चित्रपट; Akshay Kumar ने केली मोठी घोषणा...

googlenewsNext

Akshay Kumar Movies: खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारसाठी 2022 वर्ष काही खास ठरले नाही. पण, आगामी काळात तो धमाल करण्यास सज्ज झाला आहे. अक्षय कुमारच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी कमाई केली नसेल पण यामुळे त्याच्या फॅन फॉलोइंगवर किंचीतही परिणाम झालेला नाही. अक्षय कुमारने अलीकडेच त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल माहिती दिली. 

अक्षय कुमारने सांगितले की, तो 2 मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. यातील एक सायन्स फिक्शनवर आधारित वेब सीरिज आहे आणि दुसरा सेक्स एज्युकेशन सारख्या गंभीर विषयांवरील चित्रपट आहे. अक्षयने सांगितले की, दोन्ही चित्रपटांच्या स्क्रिप्टवर काम सुरू झाले असून लवकरच त्याचे चित्रीकरण सुरू होईल.

रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये अक्षय कुमारने सांगितले की, सेक्स एज्युकेशन महत्त्वाचा विषय आहे. अक्षय कुमारने अशा विषयांवर चित्रपट बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अक्षयने 'पॅडमॅन' सारखा चित्रपट केला होता. चित्रपट महोत्सवादरम्यान अक्षय म्हणाला की, सेक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे जो जगभरातील शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे. अक्षय कुमारचा लैंगिक शिक्षणावरील चित्रपट एप्रिल-मे 2023 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

अक्षयने 'पॅडमॅन' चित्रपटातून मासिक पाळीवर भाष्य केले होते. तर, 'टॉयलेट एक प्रेम कथा'मधून घरात शौचालय बांधण्यावर भर दिला होता. अक्षय कुमारच्या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा एकदा अक्षय अशाच प्रकारचा विषय घेऊन येत आहे. याशिवाय अक्षय 2023 मध्ये इम्रान हाश्मीसोबत 'सेल्फी' आणि परेश रावलसोबत 'OMG 2'मध्ये दिसणार आहे. 

Web Title: Akshay Kumar Movies: Movie based on sex education; Akshay Kumar made a big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.