Akshay Kumar Hydrotherapy Return From Germany With Wife Twinkle khanna | ट्रीटमेंटसाठी जर्मनीला गेला होता अक्षय, पांढरी दाढी, चेहऱ्यावर थकवा अशा अवस्थेत कॅमे-यात कैद झाला अक्षय
ट्रीटमेंटसाठी जर्मनीला गेला होता अक्षय, पांढरी दाढी, चेहऱ्यावर थकवा अशा अवस्थेत कॅमे-यात कैद झाला अक्षय

कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात. फिट आणि तंदुरूस्त राहण्यासाठी कलाकार विविध गोष्टी करताना दिसतात. फिटनेस फ्रिक कलाकारांच्या यादीत अक्षयचाही समावेश होतो. अक्की  नुकताच जर्मनीहून भारतात परतला आहे. नुकताच त्याला पत्नी ट्विंकलसह एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. दरवर्षी अक्षय हायड्रोथेरेपी ट्रीटमेंट घेण्यासाठी जर्मनीला जातो. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात अक्षय ही थेरपी घेतो. बॉडीला मेंटेन ठेवण्यासाठीही फायदेशीर असते. स्वतःला फिट तंदुरुस्त ठेवण्यासाठी अक्षय ही ट्रीटमेंट घेत असतो. बिझी शेड्युअलमध्ये कलाकारांना स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक असतं. अक्षयकुमार फिटनेसबाबत सजग असतो. 


नुकताच प्रदर्शित झालेला अक्षय कुमार आणि परिणिती चोप्राच्या केसरी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच घौडदौड सुरू आहे. ‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारच्याकेसरीला प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली असून यंदाच्या ‘बिगेस्ट ओपनर’ सिनेमांच्या लिस्टमध्ये ‘केसरी’ने दुसरे स्थान मिळवले आहे.

आगामी सिनेमाच्या बोलायचे झाले तर, अक्षय कुमार 'सत्ते पे सत्ता' या सिनेमाच्या  रिमेकमध्ये अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. सध्या अक्षय आणि रोहित सूर्यवंशी या सिनेमावर काम करत आहेत. हेमा मालिनी यांच्या भूमिकेसाठी दीपिका पादुकोणच्या नावाचा विचार करण्यात येत आहे. 


Web Title: Akshay Kumar Hydrotherapy Return From Germany With Wife Twinkle khanna
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.