Cuttputlli: ‘रक्षाबंधन’ आपटला आणि अक्षय कुमार लागला नव्या चित्रपटाच्या तयारीला, पाहा ‘कटपुतली’चा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 12:08 PM2022-08-19T12:08:56+5:302022-08-19T12:16:00+5:30

Cuttputlli Motion Poster Teaser : बॉक्स ऑफिसवर दणादण चित्रपट फ्लॉप होत आहेत. गेल्या ११ ऑगस्टला रिलीज झालेला अक्षयचा ‘रक्षाबंधन’ हा सिनेमाही फ्लॉपच्या रांगेत जाऊन बसला आहे. पण झालं गेलं विसरून अक्की नव्या सिनेमाच्या तयारीला लागला आहे...

Akshay Kumar Crime Thriller Film Cuttputlli Motion Poster Teaser Put Amid Raksha Bandhan flop At Box Office | Cuttputlli: ‘रक्षाबंधन’ आपटला आणि अक्षय कुमार लागला नव्या चित्रपटाच्या तयारीला, पाहा ‘कटपुतली’चा टीझर

Cuttputlli: ‘रक्षाबंधन’ आपटला आणि अक्षय कुमार लागला नव्या चित्रपटाच्या तयारीला, पाहा ‘कटपुतली’चा टीझर

googlenewsNext

Cuttputlli Motion Poster Teaser :  बॉक्स ऑफिसवर दणादण चित्रपट फ्लॉप होत आहेत. आता अक्षय कुमारचंच (Akshay Kumar) उदाहरण घ्या. बच्चन पांडे आपटला. पाठोपाठ आलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ही आपटला आणि आता गेल्या ११ ऑगस्टला रिलीज झालेला अक्षयचा ‘रक्षाबंधन’ हा सिनेमाही फ्लॉपच्या रांगेत जाऊन बसला आहे. पण झालं गेलं विसरून अक्की नव्या सिनेमाच्या तयारीला लागला आहे. होय, त्याच्या ‘कटपुतली’ (Cuttputlli ) या आगामी सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे.

अक्षयचा हा सिनेमा क्राईम थ्रीलर ड्रामा आहे. टीझरमध्ये एकाही कलाकाराचा चेहरा दिसत नाही. दिसतो तो एक गिफ्ट बॉक्स. आता या बॉक्समधून काय बाहेर येतं, हे तर रिलीजनंतरच कळेल.

अक्षय कुमारचा हा सिनेमा 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘रत्सासन’ या तामिळ सायकॉलॉजिकल क्राईम थ्रीलर चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या तामिळ चित्रपटात विष्णु विशाल व अमला पॉल लीड रोलमध्ये होते. याच्या हिंदी रिमेकमध्ये म्हणजे ‘कटपुतली’मध्ये अक्षय कुमार व रकुल प्रीत सिंग लीड रोलमध्ये दिसणार आहेत. हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय.

काय आहे स्टोरी?
तुम्हाला आम्ही सांगितलंच की, अक्षयचा ‘कटपुतली’ हा सिनेमा तामिळ सिनेमा ‘रत्सासन’चा रिमेक आहे. ही एका सायको किलरची कथा आहे. जो शाळकरी मुलींना आपली शिकार बनवतो. प्रत्येक मुलीचं अपहरण केल्यानंतर तो एक गिफ्ट बॉक्स सोडून जातो आणि एक तरूण जिगरबाज पोलिस अधिकारी या सायको किलरला पकडतो. आता हा पोलिस अधिकारी अर्थातच अक्षय कुमार असणार आहे.
कटपुतली या सिनेमाशिवाय अक्षयचे अनेक सिनेमे येत्या काळात पे्रक्षकांच्या भेटीस येणार आहेत. रामसेतू, ओह माय गॉड 2 आणि सेल्फी या चित्रपटात तो झळकणार आहे. 
 

Web Title: Akshay Kumar Crime Thriller Film Cuttputlli Motion Poster Teaser Put Amid Raksha Bandhan flop At Box Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.