ठळक मुद्देभूल भुलैय्या या चित्रपटाचा सिक्वल येणार हे वाचल्यानंतर तुम्हाला आनंद झाला असणार यात काहीच शंका नाही. पण या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये चित्रपटातील जुने कलाकार नसून सगळ्या नवीन कलाकारांची वर्णी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

अक्षय कुमार आणि विद्या बालन यांची मुख्य भूमिका असलेला भूल भुलैय्या हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील विद्याच्या अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटातील अक्षयचा अंदाज देखील प्रेक्षकांना भावला होता. या चित्रपटाला इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या चित्रपटात अक्षय आणि विद्यासोबतच शायनी आहुजा, अमिषा पटेल, राजपाल यादव आणि परेश रावल यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच बनवला जाणार असल्याची बातमी एका वर्तमानपत्राने दिली आहे. 

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार टी सिरिजचे भुषण कुमार यांना भूल भुलैय्या या चित्रपटाचा सिक्वल अनेक दिवसांपासून बनवायचा आहे आणि त्याबाबत त्यांनी फरहान सामजीसोबत चर्चा केली होती आणि आता ते दोघे मिळून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहेत. भूल भुलैय्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. पण आता सिक्वलचे लेखन आणि दिग्दर्शन फरहान करणार आहे. 

भूल भुलैय्या या चित्रपटाचा सिक्वल येणार हे वाचल्यानंतर तुम्हाला आनंद झाला असणार यात काहीच शंका नाही. पण या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये चित्रपटातील जुने कलाकार नसून सगळ्या नवीन कलाकारांची वर्णी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम सुरू असून त्यानंतर चित्रपटात कोण कोणते कलाकार असणार याविषयी विचार केला जाणार असल्याची चर्चा आहे.

भूल भुलैय्या या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये भूल भुलैय्यामधील कलाकार नसणार हे ऐकल्यावर प्रेक्षकांची निराशा झाली असणार यात काहीच शंका नाही. पण या चित्रपटाच्या सिक्वलची टीमदेखील भूल भुलैय्याप्रमाणेच तगडी असेल अशी आशा करायला हरकत नाही. 

भूल भुलैय्या हा चित्रपट रजनीकांत यांच्या चंद्रमुखी या चित्रपटावरून बनवण्यात आला होता. चंद्रमुखी हा देखील मनीचित्राथझू या मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटात मोहनलाल आणि शोभना यांच्या मुख्य भूमिका होत्या. 


Web Title: AKSHAY KUMAR AND VIDYA BALAN'S Bhool Bhulaiya GET A SEQUEL
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.