अक्षयकुमार अन् ट्विंकल आले धावून, देशासाठी येतायंत लंडनहून तब्बल 220 ऑक्सिजन कंसंट्रेटर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:11 PM2021-04-28T12:11:14+5:302021-04-28T12:15:58+5:30

Akshay kumar and twinkle khanna help corona patients : ट्विंकल खन्नाने मंगळवारी ट्विट करत अधिकृत आणि विश्वासार्ह एनजीओची माहिती मागितली होती.

Akshay kumar and twinkle khanna help corona patients donated 100 oxygen concentrators | अक्षयकुमार अन् ट्विंकल आले धावून, देशासाठी येतायंत लंडनहून तब्बल 220 ऑक्सिजन कंसंट्रेटर

अक्षयकुमार अन् ट्विंकल आले धावून, देशासाठी येतायंत लंडनहून तब्बल 220 ऑक्सिजन कंसंट्रेटर

googlenewsNext

अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाने देशातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता सुमारे 100 ऑक्सिजन कंसंट्रेटर  देण्याचे ठरविले होते. यानंतर ट्विंकल खन्नाने अधिकची माहिती दिली आहे की, त्यांच्यासोबत लंडनमधील भारतीय स्थित डॉक्टरांनी 120 ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मदतीसाठी तब्बल 220 ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्यात येतील, असं तिने  सांगितले आहे. 

ट्विंकल खन्नाने मंगळवारी ट्विट करत अधिकृत आणि विश्वासार्ह एनजीओची माहिती मागितली होती. जे एनजीओ रुग्णांच्या मदतीसाठी ऑक्सिजन सिलेंडर पुरवतात. मी त्यांना थेट लंडनवरुन ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करेन. ट्विंकलचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरलदेखील झाले होते. सगळीकडे तिच्या या निर्णयचे कौतुक करण्यात आले होते. 

ट्विंकल खन्ना आणि अक्षयकुमारने मदतीचा भाव जपला. कोरोना महामारीच्या काळात देशावरील हे संकट आपलं संकट असल्याचं दाखवून दिलंय. ट्विंकलच्या या संवेदनशील स्वभावाचं सोशल मीडियातून कौतुक होत आहे.भारतात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांना योग्य वेळेत ऑक्सिजन बेड, इंजेक्शन आणि उपचार मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या विदारक परिस्थितीत आता कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अनेक जण मदतीचा हात पुढे करतायते. 
 

Web Title: Akshay kumar and twinkle khanna help corona patients donated 100 oxygen concentrators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.